|/T/S/F८॥ पाणिपतची बखर ४५ दर मजल करीत चालले. खेचेवाडीपर्यंत गेले. तेव्हां कोणे एके दिवशी रात्रौ भोजन करून मजलसीस वसले असतां रायास भाऊसाहेबांचे स्मरण जाहालें. तेव्हां गहिवर येऊन अश्रुपात करू लागले. इतक्वा समयांत कोणी कलावंतिणी नृत्य करावयास आल्या. त्यांनी उत्तम प्रकारचे गायन करून रायाची मर्जी सुप्रसन्न केली. तेव्हां साहेबांनी म्हटलें कीं, “ज़ी इच्छा असेल ती आज मागावी. मी देईन, " अशी आज्ञा जाहाली, तेव्हा त्या कलावंतिणीने पुढे पदर पसरून अर्ज केला की, " आपण दक्षिणचे ब्राह्मण, बादशहा, ज्या ठिकाणी भाऊसाहेब गेले आणि गर्क जहाले ते ठिकाण आपण दृष्टीने पाहू नये व खावंदांनीं मोहिमेस स्वतां जाऊ नये. दुसरे सरदार पाठवून शत्रुचीं पारिपत्र्ये करावी हेच आम्हास बक्षीस द्यावे. आणखी कोणे गोष्टीची इच्छा नाहीं. सर्ब कांहीं खावंदाचे चरण प्रतापे करून आम्हांस आम्हांस घरीं अनुकूळ आहे." त्या समयीं पुरंदरे वगैरे ब्राह्मण मंडळी कारभारी व भराठे व मुसलमान सरदार यांनी रायास विनंती केली की, १४ महाराजांनी इच्छा असेल तें मागावे, मी देतों, असे वचन दिले; त्यापेक्षा हे बक्षीस कलावंतिणीस देणें प्राप्त, अशा भागास गोष्ट आली. याजवर धनी समर्थ आहेत. याप्रमाणे सर्वांची भाषणे रायांनीं श्रवण करून माघारां ढाला फिरविल्या. ४१. नानासाहेब कैलासवासी । फिरून स्वारी पुण्यास येऊन विक्षिप्त भाऊसाहेबांचे वियोगे करूनच जाहाले. काम कारभार कार्याकारण होऊ लागले, गादीवर बसाणे त्याचाही त्याग केला. दिवसेंदिवस शरीर कृश झाले. इंहिदे शितैनांत जेष्ठमासीं नानासाहेबांनी कैलासवास केला. ४२. विश्वासरावांचे प्रेत गोसाव्यांचे हवाली। भाऊसाहेब व जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार व पाजी जाधवराव व बापूजी बल्लाळ फडके वगैरे मंडळीचे ठिकाण लागलेच नाहीं ! विश्वासराव साहेब यांचा हत्ती प्रेतासुद्धां शत्रूनीं वळवून नेला. आणि विश्वासराव (१) ढाला-निशाणे. ढाला फिरविणे-सैन्य मागे फिरणे. (२) कार्याकारण-जरूरीपुरता. (३) इहिदे सितैन-सुरू सन ११६१ इ. स. १७६१.
पान:पाणिपतची बखर.pdf/90
Appearance