४४ रघुनाथ यादव-विरिचत नानासाहेबांची आज्ञा न उल्लंघितां, दररिकिबीस तरवार फत्ते तरून, जन्मप्रभृती जय संपादून शके १६८२ विक्रमनामसंवत्सरीं मंगळवारी पौष शुद्ध' अवतार संपविला. ते दिवशीं मागील चारघटिका दिवसास सूर्य असतांच अंध:कार पडला. रण रात्रीस हा कालपर्यंत घमत असते !। ३९. नानासाहेबांचा शोक तें तहकीक वर्तमान एक वारनिसाने डाकेबरोबर पुण्यास नानासाहेबास लिहून पाठविलें. वर्तमान नानासाहेबांनीं श्रवण करून भाऊसाहेबांची बहूत खंती करू लागले. रात्रंदिवस जेवितां व स्नानसंध्येत व कारभाराचे कचेरीत व झोंपेंत भाऊ ! भाऊ ! म्हणून डचकून उठे लागले. केवळ भाऊसाहेबाच वेड लागले. " हाय ! हाय ! भाऊ ! माझं दृष्टीस केव्हां पडशील ? केव्ह। भेटशील ? माझा पुत्र विश्वासराव गेला. त्याचे मला फारसे स्मरणही होत नाही. परंतु भाऊसाहेबांनीं मला मागे टाकून आपण स्वर्गवास केला. मा। अंधळ्याची काठी चोरून नेली ! माझे धनाचा चरू कोणी चोरून नेला । कळेना !! आतां प्रपचांत राहून कांहीं एक नफा नाही. आतां देहत्या" करावा अथवा संन्यास घ्यावा अथवा वैराग्य घेऊन जिकडे भाऊसाहेब तिकडे जावे, हा हेतू. यापरता दुसरा विचार नाही." असा शोक जाहला. ४०. भाऊसाहेबांचे उसने घ्यावें। तदनंतर सर्व कारभारी यांणीं परोपरी विरापना केली. तथापी नाप साहेब शोकार्णवीं पडोन म्रांत जाहाले. अन्न, पांणी, तांबुल, विलास, नृत्य, कारभार व कोणत्याही गणे करून व कोणत्याही विषयेकरून मजा । होईना. सबब पुणे मुक्कामी दुसरी फौज होती ती सिद्ध करून भाऊसाहेब उसने घ्यावे या कारणास्तव हिंदुस्थान प्रांतीं मोहिमेस चालले. काय कारभान्यांचे पुढे चालेना. रामचंद्रासाठी भरताने अयोध्यापूर सोडून ना ग्रामीं राहून वैराग्यवत् उदास जहाले; तद्वत् राव नानांनी आरंभिले. " (१) भाऊसाहेबांच्या बखरीत ‘तो दिवस शके १६८२ पौष शुद्ध ° बुधवासर होता’ असा उल्लेख येतो. (२) बारनीस-सरकारी नोंद करणारा नागपूर प्रत-बारसनिसाने व वकिलाने. (३) नागपूर प्रत-' माझे निधन (निर्धनाचे) धनाचा चरू' चरू-तांब्या.
पान:पाणिपतची बखर.pdf/89
Appearance