Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर ४३ बारगे करतील, हाच संकल्प !' तेव्हां सरदारांनी तसलिमात करून, बिबीसाहेबांचा हुकूम घेऊन, एकदांच घोड्यांच्या अनीना उठवून मोहळाच्या माशा उठतात त्याप्रमाणे सर्वत्रांनीं उडी घातली. तोफा व बंदुका आणि बाणांचा कैच्या व गरनाळा आदि करून अगदींच राहिल्या. तरवार चालती जाहाली. ३७. कल्पांतीचा आदित्य तेव्हा राव भाऊंनी त्या रोहिल्यांप्रमाणेच उडी घातली. पहिल्या लढाईच्या वेळेस सव्वा चार लक्ष फौज गणतीस लागली होती. त्या अलीकडेस सर्व सैन्य लढायांत खपून तीस सहस्र घोडा स्वार शिल्लक राहिला. त्या सुद्धां भाऊसाहेबांनी उडी घातली. तेव्हां [ भाऊ ] केवळ कल्पांतींचा आदित्य भासला. ग्रीष्म ऋतूच्या दिवसांत मेघांचे ढग उठतात आणि विद्यलता चमकून लागलीच नाहींशी होते, त्याप्रमाणे भाऊसाहेबांनीं संग्रामांत उडी घातली ते समयीं सर्वास दिसले. तिकडील खांसा अबदल्ली व मनसूरअल्ली व सुजातदौले इराणीकडील नादिरशाह, तंबूरशाह, वगैरे उरल्या फौजेसहित त्यांणीही उडी घातली. ते समयीं श्रीहरी त्या अमित्राकडील फौजेस सन्मुख जाहला. श्रीमंत पेशवे बहादूर यांस विन्मुख झाला. याजमुळे सर्व नाश झाला. ३८. सूर्य असतांच अंध:कार हत्ती घोड्यांनी व उंटतट्टांनी संपूर्ण खंदक भरला. खंदक भरल्यावर जे लोक भिकारी होऊन अन्न अन्न करीत दुसरा वेश धरून पुण्यास आले ते आले. कितीकांचे तोतये जाहाले. हजारों हजार त्या कुरुक्षेत्रीं रणमंचकीं निजलेच राहिले ! पुढे असा संग्राम होणे कठीण आणि अशा पुण्यभूमीस मरणही येणे कठीण. त्यांत धारातीर्थ ! भाऊसाहेब केवळ परशुराम-अवतार, लढाईची या मृत्युलोकीं कीर्ती करून, मोठमोठ्या शत्रूची पारिपत्ये करून, मरणकाळपर्यंत (१) तसलिमात-प्रणाम, नागपूर प्रतीत ' मान तुकावून' असे आहे. (२) अनीना-लगाम. (३) श्रीमंत..विन्मुख झाला-हे वाक्य पुणे प्रत १ व भिवंडी प्रतीत नाही. (४) नागपूर प्रत-शत्रूचे नक्षे उतरून,