४२ रघुनाथ यादव-विरचित कारण नाही. आपण उज्जनीस साल मजकुरी छावण्या कराव्या, पेस्तर सालीं शत्रू आपण पाहातच आहों. पुण्यास जावयाची खावंदांस शरम वाटेल तर अलीकडे गंगा अथवा नर्मदा अथवा क्षिप्रा एवढया स्थळीं मक्काम वर्ष सहा महिने करून, सर्व सरदार, घोडे, हत्ती व उंट व तट्टे, पायदळ, व तोफखाना यांचे वैल व अवाँतर सेना खाऊन पिऊन हुशार होऊन पेस्तर साली रूमशामची खबर घेऊ ! हिंदूचे मुसलमान होऊ परंतु छत्रपतीचे नांव राखू वांत अंतर नाहीं ! आणि आपण कांहीं पदरचे सरदार यांचे ऐकत जावे. कारण पेशजी साष्टी, वसई कैलासवासी चिमाजी आपा यांनी फत्ते केली. आणि प्रतिज्ञा मोठीच केली होती, परंतु चौघां सरदारांचे मतें कोणतीही एकदिी गोष्ट शेवटास नेत. तसेच आपण वर्तावें. " तेव्हां भाऊसाहेबांनी उत्तर केलें कीं " चिरंजीव विश्वासरावसाहेब गोळी लागून कामास आले. आतां आपण मोठा पराक्रम जरी करून पुण्यास गेलों तरी सौभाग्यवती गोपिकाबाई साहेब माझे मुखावलोकन करणार नाहींत. कारण त्यांचे केवळ जिवाचे जीव विश्वासराव साहेब ते लढाईत पडले असता त्या वडिलांचे भेटीस आपण जावे हें अयोग्य. ३६. मलकाजमानीचा हुक स एवढ्या संधीत मलका जमानीन बिवीसाहेव, दिल्लीश्वराची बादशाहाजादी, हिणे जी फौज रूमशामचे बादशाहाकडून कुमकेस इराणी व दुराणी शिलचे नादिरशाहा व तंबूरशा वगैरे आली होती त्यांस पदर पसरला की, * तुम्हीं जर लढाईस कमकसर केली तर दिल्लीचे बादशाह फकीर होऊन देशांतरांस जातात. हे समजून एक वेळ आणखी लढाई रणखंदल करावी, त्यांत खुदाने यश दिल्यास पुन: दिल्लीस जाऊं. नाहींतरि दिल्ली सोडून परागंदा होऊ तुमचे लष्करासन्निध उतरडलों हों, मुसलमानी बादशाहीची शरम ठेवून बेजरब लढाईस भिडावें. बारग्यांची फौज दरवर्षी येऊन बादशाहास इजा देऊन, घासदाण्याचे ऐवजी खंडण्या घेतात, आणि रात्रंदिवस बादशाहा दिलगीर होतात, हे दुःख सोसवत नाही. आपण बादशाहत करू अथवा F. F. (१) रणखंदल-निकराची लढाई. 43.17 ।।
पान:पाणिपतची बखर.pdf/87
Appearance