हा पाणिपतची बखर ३९ |३३. कलियुग असा योद्धा कोणी जाहाला नाहीं । त्या युद्धांत इकडील व तिकडील एकंदर चाळीस हजार लोक कामास आले. खेरीज केवळ जखमी लोक दहा हजार. याप्रमाणे युद्ध जाहाले. या मागे या कलियुगी असा योद्धा कोणी जाहला नाहीं. पुढेही होणे जरूर. भारत युद्धासमान सदाशिवपंतांनीं युद्ध केले. या कलियुगीं मानवकृतीत ब्राह्मणकुळांत जन्म घेऊन पराक्रम थोर केला. धन्य त्यांची जननी कीं असा पुत्र प्रसवली ! येणे करून सप्त पुरुष उद्धरून विष्णुलोकास गेले. धन्य त्या पुरुषाचा पिता ! त्यास साम्यता दशरथाची, किंवा पंडूची ! चिमाज पाची धन्य की हा पुत्र रामाप्रमाणे निर्माण जाहाला ! हे युद्ध पाहून स्वर्गी इंद्र व देवगण व गंधर्व स्तुती करू लागले की मानवी होऊन, जातीचा विप्र असतां, प्रताप कणांप्रमाणे केला !! केवळ राम रावण यांच्या युद्धा समान यद्ध झाले. इराणीकडील लोक तीस सहस्र कामास आले व आठ हजार जखमी जाहाले. शिवाय घोडीं वीस हजार, उंटें सातों व हत्ती दोनशें. येणेप्रमाणे अमित्राकडील तळावर राहिले. भाऊसाहेबांकडील नामी सरदार व धारकरी, एकांडे हुजरातीचे लोक वीस हजार ठार पडले. शिवाय उंटे पांचों व घोडे पंधरा हजार व हत्ती नग सव्वाशें ऐसा संग्राम जाहाला, मुख्य अबदल्लींचा पुत्र तेजूरशाहा बहादर व नजीमखां वगैरे मातबर पठाण व रोहिले हक्क होऊन गेले. खांसे सुजातदौले यास चार जखमा जाहाल्याइराणीचे फौजेने शिकस्त खाऊन माघारी फिरली. अवसान अगदीं खत्ता जाहलें. भाऊंनी सेना-सहित पिच्छा पुरविला आणि इराणीच्या गोठांत फौज नेऊन घातली. एकीकडे पठाणांची टोळी होती ती नेस्तनाबूद केली. सदाशिवराव भाऊ अभिनव यश पावले. आनंदसागरास पारावार नाहीं. शत्रू पराभवातें पावून, भाऊसाहेब व विश्वासराव साहेब उभयतां आपआपल्या अंबारींत बसून, महागर्जना करून रणतुरे व नौबती आणखी जय-वाद्ये (१) जरूर-कठीण. (२) पुणे प्रत १ व भिवंडीप्रत-' एकूण लढाया चार' असे यापुढे आहे. (३) हक्क होणे-पतन पावणे. (४) शिकस्त खाणेपराभूत होणे. (५) अवसान अगदी..यश पावलेही वाक्ये पुणे प्रत १ व भिवंडी प्रत यात नाहीत. (६) खत्ता-नाश. (७) रणतुरा-रणवाद्य.
पान:पाणिपतची बखर.pdf/84
Appearance