Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ पाणिपतची बखर लोटला. तेव्हां डावी टोळी विश्वासराव साहेवांची होती, ती बेजरब" उठली. उजवेकडून जनकोजी शिंदे कमरग्यांत शिरून मोठी मारामार जाहाली. शरसंधान अगदीच राहिले. निमचे २ व समशेरा चालू लागल्या. तीन चार तासपर्यंत एकच घाई शस्त्रसंधानाची झाली. मद्यवर मुर्दे पडू लागले. वीरांच्या नजरा फिरोन गेल्या. आपपर कोणी ओळखेनासे जाहाले. वीर रणामध्ये माजले. रणमद चढला. खांशा खांशांचे हौदे एकास एक लागून जोरावारीने लढो लागले. केवळ दशाग्नी शताग्नीशीं मारू लागले. ते समयीं सदाशिवपंत [ यांणीं ] अंबारींतून उतरून, दोहों हातीं पट्टे घेऊन, नीट फौजेत चालून घेतले. तेव्हां नामी नामी सरदार व धारकरी नांवाबिनावांचे यांणीं जीवित्वाची तमा न धरितां वेलाशक हैदोसच केला. कोणास क्षते वर्मी लागलीं, ते विष्णुलोकास गेले. व कोणी रणांगणीं मूच्छित पडले व कोणांचीं शिरें तुटोन धडांवेगळी झाली. व कोणांची उदरें फुटोन अंतरमाळा लोंबू लागल्या. परंतु अणमात्र कोणीं लढाईविषयी कसर केली नाहीं. एकच गर्दी होऊन गेली. खांसे विश्वासरावसाहेब अगदींच गर्दीत गर्द होऊन गेले. सदाशिवपंत पायउतारा होते ते घोड्यावर स्वार होऊन सैन्यांत मिसळले. मोठी तरवार करून विश्वासराव साहेब अंबारीसुद्धा संभाळून माघारे आपले जमातीत पाठविले. परंतु कायम आहेत किंवा वैकुंठवासी जाहाले याचे वर्तमान पुरतेपणे लागले नाही. आपण तसेच पुढे चालून गेले. तेथे नामी नामी लोक दोन हजार ठार पडले. इराणीने नामोहरम ७ होऊन पाठ६ दिली. ན འདུག ནང་མངའ་ (१) बेजरब-वेधडक. (२) निमचा-लहान तरवार. (३) दशाग्नी शताग्नी-याच बरोबर अर्थ समजत नाही. ‘दशग्घ्नी शतघ्नी अशा शस्त्रांना मारू लागले किंवा दहा दहा गोळ्या (अग्नि) शंभर शंभर गोळ्या लागून मरू लागले' असा कदाचित् अर्थ संभवेल-का. ना. साने. (४) पुणे प्रत ३ सोडून इतर सर्व प्रतीत ‘मरू लागले' असे आहे. (५) दोसच केला याबद्दल नागपूर प्रतीत ‘चालून घेतले. रक्तांवर लोक झाले' असे आहे, हैदोस-विध्वंस. (६) अंतरमाळा-अंत्रमाळा आंतड्यांची वेटोळी. (७) न. मोहरम-पराभूत. (८) पाठ देणे-पळून जाणे.