४० रघुनाथ यादव-विरचित वाजवीत आपले गोटाँत चालिले. एकच सिंहनाद झाला. त्यांची फौज शिकस्त खाऊन मागे गेली. ३४. विश्वासराव वैकुंठवासी। त्या संधींत मागें अबदल्ली पन्नास हजार फौजेनिशी आपले गोटांत तयारच होता. त्याचे पुत्र उभयतां लढाईत हक्क जाहाले, त्यांचे वर्तमाव श्रवण करून वाईटपणाचे ऐकतांच अबदल्ली याने फौजेसहवर्तमान या अल्ला! या खुद्दा ! या रहिमान! याप्रमाणे देवाचा धांवा करून, जीवित्वाचा संकल्प सोडून, एकदांच वाद्ये वाजवून फिरून सदाशिवपंतांवर चाल केली. तेव्हां भाऊसाहेब यश संपादून आपले गोटांत जात होते. इतक्यांत शत्रू पाठीवर आला, हे वर्तमान कळतांच महातास सांगून खाशांचे हत्ती माघारे फिरविले. ते संपूर्ण फौजेने पाहून सर्व लढाईच्या प्रसंगे नीट चालिले. लढाई सुरू होतांच विश्वासराव साहेव अंबारींतून तिरंदाजी करीत होते, एवढ्यांत कोणी दुष्टानें बंदुकीची जोडगोळी घातली. ती हृदयापार होतांच विश्वासराव साहेब लागलेच वैकुंठवासी जाहाले. तेव्हा त्या महाताने व जो खवासखान्यांत चौरीबारदार होता त्याने कमरेचा दुपेटा काढून, विश्वासराव साहेबांस अंबारीचे खांबाशीं दृढ बांधून बसलेचे बसले तीर कमाणी सुद्धा तसेच ठेविले. पुढे लढाई होतच होती. या आकांताचे वर्तमान उजवे बाजूस भाऊसाहेब होते त्यांस विदित जाहालें. ३५. भाऊसाहेबांस परम दुःख. नंतर भाऊसाहेबांनी आपला अंबारीचा हत्ती खालीं बसवून, विश्वासराव साहेब यांचे हत्तीजवळ जाऊन, तो हत्ती बसवून, रायाचें शरीर छिन्नभिन्न जाहाले होते. ते दृष्टीने पाहून परम दुःख जाहालें. ते पत्र लिहिणाराची (१) पुणे प्रत२-‘येथपासून तो ती उपलब्ध आहे तेथपर्यंत अगदी निराळा मजकूर आहे. हिचा व दुस-या तीन प्रतींचा येथपासून मुळींच मेळ पडेना, सबब तो मजकूर स्वतंत्रपणे पुढे देऊ.' असे का. ना. साने यांनी म्हटले आहे व शेवटी तो मजकूर घातला आहे. (२) खवासखाना-अंबारीच्या पाठीमागे खिजमतगाराची उभी राहण्याची जागा. (३) चौरोबारदार-चौरी धरणारा.
पान:पाणिपतची बखर.pdf/85
Appearance