पाणिपतची बखर ३७ हजार फौजेनिशीं व डावेकडे मनसूरअली चाळीस हजार फौजेनिशीं व उजवेकडे सुजातदौले व हस्तनापुरवासी इसाफतखां, येणेप्रमाणे दीड लक्ष फौजेनिशीं उभे राहिले. खांसा अबदल्ली पन्नास हजार फौजेनिशीं मागे गोठांत राहिला. दोघे पुत्र मात्र पुढे आले होते त्यांचीं नांवें, एकाचे नांव तेजूरशाहा व दुस-याचे नांव नजीमखां. यांजवळ रोहिले यांची खांसी खांसी जमेत एकदिलाची होती. त्यांतून तेजूरशाहा यांनीं पन्नास हजार फौजेनिशी दिन् ! दिन् ! म्हणून नीट चालून घेतले. ।। ३१. एकच रणधुमाळी दोन्ही सैन्यांत माजली तेव्हा युद्धास तोंड२ लागले. दारुण संग्राम जाहाला; ह्वद्यांस हवदे, राउतांस राऊत, एक मेळ जाहाला; व सुतरनाले बाणान्व्या कैंच्या व करोलाच्या गोळया व गरनाळा व तोफांचा मारा एकदांच जाहाला. एकच रणधुमाळी दोन्ही सैन्यांत माजली. धुरेकरून दिनमणींचा अस्त झाला असा भास पडला. घे घे हीच गर्जना उरुली, उमास घ्यावयास अवकाश पडेना. पुढचा पाय पुढे. कोणास कोणी हरेना. एका परीस एक आगळे. इराणीची जात अरबुज४ आपपर म्हणावयाची नाहीं. महाबळी, महापराक्रमी, मोगल, पठाण द रोहिले रांगडे व रजपूत व पंजाबी, बिलंदे माळवी व काठेवाडी वगैरे नाना जातीचे, त्यांनी संग्रामाची सीमा केली. बहूत मराठे-दळ खपले. रक्तोदकाचे पाट रणभूमीस वाहूं लागले. बीभत्स शरिरे दिसों लागली. देहाभिमान कोणांत उरला नाहीं. चौफेर लढाईची बेहद्द होऊन गेली. थोर थोर अमिरांचे हौदे खालीं जाहाले. इराणी हांवभरी होऊन फिरून नीट फौजेत चालून घेतले. तेव्हां मराठी फौज कच खाऊन माघारी सरली. ३२. रणमद चढला तें पाहातांच भाऊसाहेबांनी फौजेसुद्धा आपला अंबारीचा हत्ती फौजेत ན གརུབ ན ད ན གནང ན མ (१) जमेत-समुदाय. नागपूर प्रत-जमेत ५० हजारांची. (२) तोंड लागणेप्रारंभ होणे. (३) करोल-बंदुका. (४) अरबुज-रानटी, (५) बिलंद-अट्टलविशेषणाचा विशेषनामासारखा उपयोग. (६) खाली होणे-रिकामा पडणे.
पान:पाणिपतची बखर.pdf/82
Appearance