३६ रघुनाथ यादव-विरचित फर्श बांधिले कारण कीं, संपूर्ण वसुंधरेचे राज्य करीन किंवा इंद्रपदीचे घेईन ! अंबारींत बसतांचे सर्व शरीर लाल झाले व नेत्रही आरक्त झाले. त्या समयीं भाऊ कसा भासला की केवळ कल्पांतींचा आदित्य ! याप्रमाणे भयानक दिसू लागला. त्या वेळेस कोणाच्याने पाहावेनासे झाले. हा केवळ कलियुगीं कर्ण जन्मला यांत संदेह नाहीं. सभोवती फौज ५० हजारांचा गलोल घेऊन मध्यभागीं इराणीसमूर परम आवेश उभे राहिले. तिसरी टोळी तपशीलवार असामी वितपशील:- १. जनकोजी शिंदे. १. समशेर बहादूर. १. दमाजी गायकवाड. १. किरकोळ पथक. | P ७ ।। सदींप्रमाणे जनकोजी शिंदे व माजी गायकवाड व समशेर बाहादुर व किरकोळ पतके मिळोन साठ सत्तर हजार घोडेस्वार, याप्रमाणे जमाब करून उभे राहिले. याप्रमाणे तीन टोळ्या करून निशाणे सोडून, जंभस न खातां उभे राहिले. श्रीमंत भाऊसाहेवांची स्त्री सौभाग्यवती पार्वतीबाईसाहेब व इतर सरदारांचे कबिले३ व बुणगेबाजार ४ यांचे संरक्षणास मल्हारराव होळकर दहा हजार फौजेनिशीं मागे ठेविले. ३०. दुराणीच्या तीन टोळ्या ॐ पाहन इराणी दुराणी व दिल्लीपत बादशाहाकडील व सुजातदौले व मनसर अली यांणी आपले गोठ सोडून, फौजेच्या पुस्तपन्हा' राखून, त्यांनीही तीन टोळया करून, लढाई प्रसंगास खांसा इराणी मध्यभागीं सत्तर (१) फर्श-परशु. का. ना. साने म्हणतात, ‘ सदाशिवराव हा परशुरामाचा अवतार असे म्हणत असत. परशुरामाचे मुख्य शस्त्र परशु हे होय. (२) अंबारीत-उभे राहिले या वाक्यांबद्दल पुणे प्रत १ व भिवंडी प्रत यात • याप्रमाणे दीडलक्ष फौजेनिशी उभे राहिले' हे वाक्य आहे. (३) कविलेस्त्रिया (४) बुणगेबाजार-गैरलढाऊ माणसे. (५) पुस्तपन्हा-पाठबळ.
पान:पाणिपतची बखर.pdf/81
Appearance