पाणिपतची बखर । ३५ व्यावे किंवा तीन टोळ्या कराव्या? कोणते टोळीस कोण नेमावा ? याचा। विचार सांगावा. त्यजवर मल्हारजी होळकर यानीं विनंती केली की, "फाजेच्या तीन टोळया कराव्या.'" डावे बाजूस विश्वासराव साहेब यांज*ड लोकांच्या नेमणुका जाहाल्या. तपशील मोठे मोठे नामांकित सरदार असामी:-- १ यशवंतराव पवार, १ संताजी टोळे. १ जंगी समशेर. १ जिवाजीपत. १ गोविंदराव निंबाळकर. १ गोविंदराव व्यंकटेश. १ दत्ताजी वाघ. १ से काजी वाव. १ बधकर मंडळी. १ फिरंगोजी पवार. १ चिमणाजी माधवराव. १ सोनजी भापकर. १ व्यंकाजी मोहिते. १ हिराजी पवार. १ भगवंतराव रणदिवे. १ धाराव पाटणकर. १ यमाजी बांडे. १ मानसिंगराव मुळे. १ मायाजी बाडगेकर. १ चिमणाजी जनार्दन. १ सदाशिव विष्णू १ चिमाजी मोहिते. १ हसनखां. १ फरदुल्लाखां. १ रहिमतखां. १ कमालखां. १ चंदूखां. पायदळ, १ फूट पथके. १ सफेजंग जमादार. १ मीरवेग. १ हसनखान. १ बडेखां. १ सुजातखां. एकूण ३४ आसामी. सदहंप्रमाणे जाहाल्या. यशवंतराव पवार पंचवीस हजार फौजेनिशीं केवळ महाभारतींचा वीर, नामांकित, जगत्प्रसिद्ध, ज्याच्या पराक्रमाचा लौकिक वडिलोंवडिली सरकार-चाकरी करून संपादीतच आले. याप्रमाणे नामी नाम सरदार व धारकरी मिळोन एकंदर राऊत चाळीस हजार. शिवाय पायदळ इभ्रामखां गाडदी यांजकडील, प्रमुख सफेजंग जमादार व हसनखां व फर. दुल्लाखां व चंदूखां वगैरे गार्दी लोक पंचवीस हजार व फूटपथके पांच हजार एकूण विश्वासराव साहेबांचे टोळीस फौज सत्तर हजार. दुसरी टोळी सदाशिवपंत भाऊ खांसे अंबारींत बसून ४ [ अंबारीच्या ] खांबात नवरत्नांचे (१) नागपूर प्रत-सदाशिव विष्णू वगेरे फूटपथके (२) नागपूर प्रत* एकूण फौज घेऊन विश्वासराव खांसा गजपृष्ठावर आरूढ होऊन वामकटी चापबाण आकर्षण करून वीरश्रीत उभे राहिले. (३) नागरपुर प्रत-यापट * सव्यभागी ' असा शब्द आहे. (४) नागपूर प्रत- बसून हाती शरचाप घेऊन ठाण मांडिले.
पान:पाणिपतची बखर.pdf/80
Appearance