३४ रघुनाथ यादव-विरचित तुमच्या हवाली करून के लासभुवनास गेले. त्या गोष्टीची शरम तुम्हांत असावी. यश किंवा अपयश हे तुमचे तुम्हीं सांभाळावें । म्हणून भाऊसाहेबांनीं सर्वास पदर पसरून सांगितले. तेव्हां होळकरादि सरदार यांनी उत्तर दिलें कीं, “ आम्ही जीवित्वाची तमा धरीत नाहीं ! महाराजांचे पुण्य आमचे मस्तकीं असतां इराणीची बिशाद काय ? मारून गर्दीस मिळवून देऊ. आपण कांहीं चिंता न करावी." याप्रमाणे बोलून मुजरा करून आप आपल्या मिसळेस' उभे राहिले. २९. खंदकपार जाहाले । पेशजी इराणीने शुभ्र कुंजर भाऊसाहेबांस दिला होता तो ऐरावतातुल्य भयंकर, दुसरा शामसुंदर गज कज्जलप्राय शूरत्वांत आगळा रणरंगधीर, तिसरा गजानन बक्ष. हे तीन हत्ती हो गारून आणून उभे केले. पंचरंगे करून चित्रविचित्र शुंडादंड मस्तकावर रेखिले व वादली पाखरा गजपृष्ठीवर घालून सुवर्ण मंडित पिंपळवने मुक्तलडांच्या झालरी व गळ्यांत रुप्याच्या घंटा व रुप्याच्या वांकी, तोडर पायीं रुप्यासोन्याच्या अंबाच्या हत्तींवर ठेवन चौफेर मोत्यांचे घोस लाविले. ते मदोन्मत्त वारण विलोकितां केवळ सुरेझ्वराचे ऐरावत भासले, रणरंगधीरः गजावर सदाशिवपंत भाऊ आरूढ । जाहाले व गजानन वक्षावर खांसे विश्वासराव साहेब स्वार जाहाले, व शुभ्रवर्ण गजबक्षावर जरीपटका ठेविला. तिसरी नौबत करवन, भीमा ऐशी। गर्जना करून खंदकपार जाहाले. पुढे बाणांच्या खोंचेचे ४ तफावतीने उभे। राहिले; व संपूर्ण सरदार लहान थोर भाऊसाहेबांजवळ येऊन फिरून मुजरे केले. सर्वांचे मुजरे घेऊन सेनासमेत उभे राहिले. भाऊसाहेब यांनी सारी सेना गोचर केली. तो फौज असंख्यात, नजर पुरेनाशी झाली. तेव्हा भाऊसाहेबांनीं मल्हारजी होळकर यांस विचारलें की, कोणते तन्हेने सैन्याचा विभू चावा ? शत्र आपले कबजांत कोणते त-हेने आणावा ? एकदांच चालुन १५ (१) मिसळेस-नेमलेल्या जागी. (२) मुक्तलगाच्या-पाठभेद, (३) पुणे १ व भिवडी प्रत- एकदा रणरंगधीर एकदा रणवीर असे नांव आढळते. (४) खोंच- मारा. (५) सर्वाचे हे वाक्य पुणे प्रत १ व भिवंडी प्रत यात नाहीं.
पान:पाणिपतची बखर.pdf/79
Appearance