* पाणिपतची बखर ३३ जाहला तीन प्रहरांचा समय होतांच उभयतांनीं निद्रा संपादिली. कांहीं निद्रा लागली न लागली एवढ्यांत जागृत होऊन, शौचविधी करून, मुखप्रक्षालन करून खिजमतगारास आज्ञा केली कीं, नकिबास बोलावणे करून हुकूम द्यावा की, लहान थोर सरदारांनी तयार होऊन लढाईस चलायें. याप्रमाणे नकिवांस ताकीद होतांक्षणीच ते संपूर्ण सैन्यांत फिरून, ताकीद करतांक्षणीं सर्व सरदार लहान थोर एकदील होऊन शिलेपोस सरंजामानिशी तयार जाहाले. २८. आजचा निदान समय तदनंतर विश्वासराव साहेब व भाऊसाहेब या उभयतांनीं तैलाभ्यंग करून मंगलस्नानें केलीं. देवतार्चने संपादून, फलाहार अल्प करून, पिकले पानांचे विडे घेऊन, जामदारखान्यांत जाऊन, रणांगणींचीं पीत बस्त्रे घेतलीं. शिरपेंच व तुरे व चौकडे व बाजूबंद, व मोत्यांच्या कंठ्या व शस्त्रास्त्रे ठायीं ठायीं बांधून तरकसकमाना हातीं घेऊन सज्ज झाले. नंतर निशाण बारदारांनी निशाणे घेऊन नगारा नौबदी करून एकदांच गर्जना केली. तेव्हां भूमंडळ नादेकरून तुंबळ जाहालें. तेणेकरून रणरंगधीरांस वीरश्रीची स्फुरणे आली. प्रातःकाळ होतांच दुसरा नगारा जाहाला. तेव्हां तमाम सरदार तयार होऊन येऊन, सदाशिवपं तांस मुजरे करून आपआपले घोडयावर स्वार जाहाले. भाऊसाहेबांनी मल्हारजी होळकर व जनकोजी शिंदे व दमाजी गायकवाड यांस सन्निध बोलावून आणून सांगितले की, " आजचा निदान समय, शंभर वर्षे पूर्ण भरलीं. आणि आज सतीचे वाण घेतले. त्यापुरती दुसरी गोष्ट अणु मात्र चित्तांत आणू नये. तुम्ही पुरातन कैलासवासी रावसाहेब व अपासाहेब यांचे वेळचे यख्त्यारीं आहां. आजपर्यंत अन्न भक्षिले त्याचे आज सार्थक करून दाखवावे. स्वर्गी रावसाहेब व आपासाहेव भलें म्हणतील ते कर्म करावे ! रायांनी ६ दौलत सुद्धा आम्हांस (१) जामदारखाना-वसनागार. (२) निशाण बारदार-निशाण धरणारा. (३) पुणेप्रत-नभमंडळ. (४) रावसाहेब-बाजीराव, आपासाहेब चिमाजी. (५) यख्त्यारी-अधिकारी. प्रमुख सरदार. (६) रायांनी-बाजीराव चिमाजीअप्पा यांनी.
पान:पाणिपतची बखर.pdf/78
Appearance