३२ रघुनाथ यादव-विरचित पासून गेली !" ऐसी भाषणे ऐकून सर्वास गहिंवर आला. त्याजवर विश्वासरावांनी उत्तर केलें कीं, ६ माझे प्राणांविषयी मजला तिलमात्र काळजी वाटत नाही. परंतु हा समय आपल्यावर गुजरला. मागे नानासाहेब तुम्हांवाचून घटकाभर प्राण ठेवणार नाहींत ! आपण उभयतां बंधु एक धर्मराज व एक अर्जुन, किंवा एक श्रीरामचंद्र व एक भरत, याप्रमाणे पराक्रमी असतां हा प्रसंग घडून आल्यास श्रीमंत नानासाहेबांची काय गती होईल ती कळेना. तुम्हीं उभयतां बंधू कायम असल्यास माझे सारिखे पुत्र बहुत होतील !" ऐशी उदासपणाची भाषणें विश्वासरावाचीं राव भाऊंनीं श्रवण करून विश्वासरावास आलिंगन देऊन बहूत श्रमी जाहाले. भाऊसाहेब म्हणू लागले की, " आही तरि सतीचे वाण घेतले, आतां तुम्हांस ईश्वर साह्य आहे." त्याजबर विश्वासरावांनी उत्तर केलें कीं, " आपण वडील संनिध असतां मला भय काय ? त्यांतून ईश्वरी इच्छेकरून ही गोष्ट बनन आली असतां दुसरा मराक्रम जन्मास येऊन कोणता करावा ? आतां प्रतिज्ञा हीच की, रूमशामची बादशहात करून रूमशाम येथील सरदेशमुखीच्या वतनाचीं वस्त्रे श्री छत्रपतींच्या नांवें घेऊन, आजपावेतों हक्काचा ऐवज राहिला आहे। तो घेऊन ढाला माघाच्या देऊ ! नाहीं तरि जो प्राणी जन्मास आला त्यास तरि मृत्यु आहेच. परंतु या कुरुक्षेत्री रणांगणाचेठायीं पराक्रम करून मृत्यू आल्यास दुसरे काय पाहिजे ? याजकरितां मजविषयी अणमात्र चित्तांत कांहीं एक आणू नये. जें ईश्वरानें नेमिलें असेल ते कदापी टळावयाचें नाहीं. मग खेद करावयाचे कारण कोणते ? नानासाहेबाहून मला तुम्ही वडील अधिक ! त्यापेक्षां श्रमी होऊ नये. तेव्हां समस्त सैनिकांस निश्चयात्मक कळले. १.|F । १२७. लढाईस तयार ।। ६२ ।। ते दिवशी सदाशिवपंतांनी व विश्वासराव यांणीं कडकडीत निश्चक्र केले, उदकही घेतले नाही. रात्रीचे ठायीं विश्वासराव साहेबांनी व राव भाऊंनी साखर, बतासे, फळफळावळ मात्र भक्षिली. तों मध्यरात्रीचा समय (१) सतींचे वाण- दृढ प्रतिज्ञा. मरावयास सिद्ध होणे. (२) ढालानिशाणे. (३) निश्चक्र- ‘उपवास' पाठ.११॥
पान:पाणिपतची बखर.pdf/77
Appearance