॥ पाणिपतची बखर ३१ कुरुक्षेत्रीं धारातीर्थी सुस्नात झाले, तदनुरूप आपणही व्हावे. या परता पराक्रम कोणता ? सर्व सत्ता श्रीकैलासनाथाची ? त्याप्रमाणे घडून येते. दूषणे लावितां तीं प्रमाणच. गेल्या गोष्टी पुढे येतात असे नाही. प्रस्तुत पुढची विचारणा चित्तांत आणून यश छत्रपतींचें सांभाळावे. हे यश तुम्हां समस्तांचे आहे ? निदान समयसागरतारक पिनाकपाणी आहे, मग इराणीची तमा ती काय ? आतां भय धरल्याने काय होते ? श्रीसांबकृपेने इराणीस मारून गर्दीस मिळवून देऊ. सत्कीर्ती करून मरावे या भूषणापरतें दुसरे काय आहे ? उद्या सर्वांनी खंदकपार होऊन मारतां मारतां कटून मरावे. या भूषणापरतें दुसरे काय आहे ?" हा निश्चय सदाशिवपंतांनीं करून लहान थोर सरदारांची क्रिया' घेऊन सर्वत्रांस विडे देऊन बोळविले. २६. भाऊसाहेब व विश्वासराव यांची भाषणे व प्रतिज्ञा नंतर विश्वासराव साहेब सदाशिवपंत पुरंदरे व महिपतराव चिटणीस व बाबा फडणीस यांचे चिरंजीव नाना फडणीस व अप्पाजी जाधवराव व अंताजी माणकेश्वर व रामाजी अनंत दाभोळकर व समसेर बहादर व सदाशिव अप्पाजी पाग दिमत सुलतानखां वगैरेचे ममतेचे मंडळ एकांतीं घेऊन त्यास विचारले की, " समय तर तुटक व दुर्घट प्राप्त झाला. प्राणावर येऊन बेतली. होणार तेच घडून येते. चिरंजीव विश्वासरावसाहेब, तीर्थस्वरूप नानासाहेबांचे व सौभाग्यवती गोपिकाबाईचे प्राणांचेही प्राण ! अगोदर विश्वासराव साहेब यांस आमचे बरोबर पाठवीत नव्हतीं सौभाग्यवती गोपिकाबाई साहेबांनी माझे मनोधारणास्तव [ पाठविलें व ] विश्वासराव साहेब आमचे ममतेस्तव हेंका करून स्वारीस आले. आणि आतां तरि गोव्ट अनुचित बनून आली. विश्वासराव साहेब ! तुमचे वय लहान. तुम्हीं सुखाची जाती तिलप्राय अनुभवली नाही. तुम्हांसारखे सगुण पुत्र, उभयतांची ममता तुमचे ठायीं विशेष, असे असतां हें महत्तर अपेश श्रीसांबाने माझे विभागास आणिलें " असे बोलतांच भाऊसाहेबांच्या नेत्रांस पाणी आलें कीं, “ रावसाहेब ! तुम्हास मी मरणाचे घरीं आणिले. ही गोष्ट सर्वोपरी आमचे (१) क्रिया-शपथ. (२) नागपुर प्रत- ‘ नानासाहेब अगोदर विश्वासराव यांस आमचे समागमें पाठवीत नव्हते'. (३) सर्वोपरी- सर्व प्रकारे.
पान:पाणिपतची बखर.pdf/76
Appearance