Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० रघुनाथ यादव-विरचित

  • सुईच्या अग्रीं मृत्तिका देणार नाही.' या हट्टामुळे मार्गशीर्ष वद्य ३०

अमावास्या सांयकाळीं राजा दुर्योधन गदायुद्धांत पडून राज्य हारविले. तसेच भाऊसाहेब ! आपणांस घडून येते असे दिसते. आतां अंत राहिला नाहीं. तुमच्या लष्करची खराबी इराणीस कळली. आतां सर्वस्वीं बुडवितो. काळचक्रांत सर्व पडलों. उत्तम गोष्ट बनून न आली. पहिल्यानेच सलूख संपादिला नाहीं, आतां इराणी तुम्हांस खातरेत आणीत नाही. हेका केल्यामुळे दौलत सारी बुडाली. या समयीं या ठायीं श्रीमंत राजश्री नानासाहेब असते तरी |कसच्या गोष्टीचा हेका न करिते. तुम्ही प्राणानिशीं जातां. तुमचे चित्तांत असे येत असेल, इराणीचा मजकूर वि ती ? मारून धुडकावून देऊ ! ही गोष्ट सांगतां खरी, परंतु तो प्रसंग आतां नाहीं. हा जीव तुमचे अन्नाचा या प्रसंगीं खर्च जाहाला असतां चांगला, परंतु अगोदर अन्नावांचून डोळ्यापुढे अंधाच्या येतात. तेव्हा युद्धाची उमेद कशी धरावी ? आतां जीवित्वाची तमा धरून रांडापोरे वाचतात असा अर्थ नाही. तुम्हीं सर्वांचा घात केला. आपल्या हा ते सर्व वैभव बुडविलें. आमच्या डोळ्यादेखत आमची रांडापोरे गिलचा बाटवितो तें दुःख प्रत्यक्ष दृष्टीने पाहावे. आपण आपला कुटुंबघात आपल्या देखत करून उद्यांच्या लढाईत आम्ही सर्व प्राणांनिशीं गेल्याने आपली स्वारी फत्ते होते की काय ? २५. ‘सत्कीर्ती करून मरावे या भूऽ णापरतें दुसरे काय आहे ?' अशा प्रकाराची सर्व समुदायाची उत्तरे जिकिरीचीं रायांनी ऐकून घेऊन प्रतिउत्तर दिलें कीं, “ होणारास उपाय काय ? कोणी आपण आपले अनिष्ट चितीत नाही. दैवगतीने घडून आल्यास उपाय कोणाचा ? यश किंवा अपयश महाराज छत्रपतींकडे आतां शरीर तृणप्राय मानून, मर्दुमीचा हिय्या न सोडितां, समशेरीची शर्थ करून दाखवावी. कौरव पांडव सकल सेनेसहित

  • -4a_८-१०

| (१) मार्गशीर्ष वद्य या ऐवजी नागपूरप्रत व पुणेप्रत २ मध्ये ‘ या कुरुक्षेत्री हाच मास हाच दिवस विक्रमनाथ संवत्सर पौष शुद्ध ८' असे शब्द आहेत. का. ना. साने म्हणतात, ‘ कौरव-पांडवांच्या युद्धास मार्गशीर्ष शुद्ध १५ च्या सुमारास प्रारंभ होऊन पौष शुद्ध ३ स दुर्योधन पडला, असे भारतावरून होते.’ (२) जिकिरोची-असहायतेची.