Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ पाणिपतची बखर विश्वासराव साहेव बिचव्यांत बसले होते. तेथून कचेरीचे डेन्यांत येऊन खलबतास बसले. तेव्हा सर्वांनी सांगितले की, " आज सव्वा महिन्यांत तवाई सर्वांनी सोसली. अन्न पाण्यावांचुन घोड्यांमाणसांचे प्रांण जातात. पुढे महाराज काय तजवीज सांगणे ती सांगावी ! अन्नावांचून हात पाय सुजले. तरवार कोणत्या रितीने करावी ? साहेब आजपर्यंत यश संपादून शत्रू पादाक्रांत केला. आतां सर्व दौलत बुडवून नाश आरंभिला. दुसरे कांहीं एक नाहीं. विनाशकाळासारिखी तुमची बुद्धी झाली. आपणांबरोबर आम्हां सर्वांची घरे बडतात. आमचीं रांडापोरे आमच्या डोळ्यांदेखत इराणी घेऊन जातो, असा समय प्राप्त जाहला. तुमचे बुद्धीस भ्रंश झाला, म्हणून आपण तिळमात्र कोणाचे ऐकत नाहीं. उगीच हेका केला तो या समयीं फळास आला. सारांश आपण सर्वांचे मान्य करून सलूख करून देशी गेलों म्हणून गांडू जाहलों असा अर्थ नाही. या हट्टानें सर्व लयास गेलें कांहीं आहे तेंही जाणार. नकळे ईश्वराचा महिमा ! होणार [ त्या ] सारखी बुद्धी उत्पन्न होते. विचार हरल्यामुळे नैषधास व श्रीरामचंद्रजीस अपाय घडला, तसा प्रकार आपणासही घडोन आला. तुम्हांस श्री सांबाने अजरामर ऐश्वर्य दिले असतां, भाऊसाहेब ! तुम्हीं बुडविले. आज तो प्रसंग प्राप्त झाला. सुबद्धी सांगतां तुम्हांस श्रम वाटतात. पुढे कर्माची गती दुस्तर ओढवणार त्यासारखे घडोन येते. ‘होणार ते कधी चुकत नाहीं, ' ऐसी वडिली म्हण आहे. ते वेळेस जनकोजी शिंदे यांणीं दृष्टांत दिला की, ‘ रावणास श्री सांबाने चवदा चौकड्यांचे राज्य करणे म्हणून वर दिला असतां, श्रीसीतादेवी आणिल्यामुळे सर्व राज्य बुडविले. विभीषण आणि कुंभकर्ण वगैरे मंडळींनी मडोदरी सुद्धां सीता देण्याविषयी उपदेश केला. परंतु कोणाचें न ऐकतां लक्ष पुत्र व सव्वालक्ष पौत्र व ऐशी सहस्र स्त्रियांसहित कुलक्षय केला. त्याचप्रमाणे भाऊसाहेब ! तुम्ही केले." त्याजवर मल्हारराव होळकर यांणीं दष्टांत दिला जं, ' द्वापरयुगी राजा दुर्योधन शत बंधंसहित राज्य असतां द्रौपदीमळे सर्व राज्य लयास गेले. ते काळीं व्यासांनीं व विदूरांनी व श्रीकृष्ण परमात्मा यांनीं बहूत प्रकारे सांगितले. परंतु राजाचे म्हणणें कीं, (१) बिचवा-लहान तंबू काठी नसलेला. (२) साहेबी-स्वामींनी. ।