Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर २१ व दुसरे टोळींत सुजातदवले पन्नास हजार फौजेनिशीं व तिसरे टोळींत मनसूरअली तीस हजार फौजेनिश, मध्यभागीं मुख्य इराणी पाऊण लक्ष फौजेनिशी, याप्रमाणे आपआपले सरदारांस व पायदळांचे जमातदारास निसून ताकिदो रणप्रसंगाच्या होऊन वेलाशक चालून घेतले. तोफखान्यावर जाऊन पडले. एक रंजकेची सरवत्ती होतांच दोहों दळांत धुंध:कार होऊन एकमेकांस दिसेनासे जाहालें. धुराने दिवाकर अगदींच आच्छादित जाहाला. आपपर कोणी ओळखेनासे जाहालें. दोन प्रहरपर्यंत एकसारिखा तोफखाना उभयतांकडील सुरू होता. धूर निवारण होतांच पाहू लागले तों अमित्रावडील पठाण वीस हजार कारास आले, व सदाशिवपंत भाऊंकडील लोक पायदळ व घोडेस्वार अजमासे वीस पंचवीस हजार पानास आले. श्रीमंत विश्वासराव साहेब व सदाशिवपंत भाऊ व मल्हारजी होळकर व जनकोजी शिदे व यशवंतराव पवार व अंताजी माणकेश्वर व अप्पाजी जाधवराव व विठ्ठल शिवदेव विंचूरकर, समशेर बहादूर वगैरे धारकरी व हुजरातीचे लोकांनी व एकांड्यांनी एकदांचे सर्वांनीं श्रो-जाश्वनीळाचे स्मरण करून व शाहू महाराज छत्रपती यांचे नांव घेऊन, हर हर महादेव ! ! ही गर्जना करून घोडे घातले. इराणी दुराणी व अवदल्ली व सुजात दोला व मनसूर. अली व अवदल्ली नादरशहाचे बेटे व दिल्लीपत बादशाह।कडील खांसे खांसे बादशाहाजादे व राठोड, रांगडे व रजपूत व सेवाती व हस्तनापुरवासी यांणीं " या अल्ला खुदा ! या रहिमान रहीम ! " याचा उच्चार करून एकदां नीट कमरग्यांत शिरले. तेव्हा तीस हजार फौजेनिशीं जनकोजी शिंदे व समशेरबहादूर यांनी त्यांजकडील सर्व फौज पोटीं घालून घोडे घातले. तेथे मोठी झोटधरणी होऊन वरकड हत्यारांची लढाई व तिरंदाजी ही राहिली. लढाईची हातघाई झाली. भाला व बिचवे व गुरगुजे व जमदाडाव वाघनखे यांचे चपेटे १० (१) जमातदार-नायक. (२) रंजक-स्फोटक दारू. (३) अमित्र-शत्रू. (४) कामास येणे-लढाईत पडणे. (५) जाश्वनीळ-शिव. (६) नागपूर प्रत-या अल्ला या खुदा या रहिमान दिन् दिन् (७) कमरगा-सेनामध्य. (८) झोटधरणी-खटपट. (९) जमदाड-लांब तलवार. (१०) चपेटे-हल्ले.