२२ रघुनाथ यादव-विरचित फार झाले. एकमेकांच्या गळ्यास मिठ्या मारून पुढचे पाय पुढे टाकू लागले. कोणी मागे फिरेना. सक्रोध होऊन, अवसाने धरून एकमेकांवर पर्जन्यप्राय कोसळू लागले. मल्लयुद्धाचे मारणेच कडोविकडीचे परस्परें दाखवू लागले. या युद्धांत वांचून पुनः दक्षणेत जाऊन संसार करावा हीं अरुता कोणी ठेविली नाही. कोणी महाकाल, कोणी कृतांत असे भासले. कितीकांस मूच्र्छना येऊन रणभूमीस निचेष्टित पडले. कितीकांचीं शरीरे त्या गर्दीच्या रवंदळींत चिरडून गेली. कितीकांचे हात पाय तुटून नुसते कोथळे रणांत राहिले. कितीक वीर रक्तबंबाळ होऊन भयंकर दिसू लागले. कितीक वीरांच्या पाठींतून भाला हृदयपार होऊन आपआपले पुण्याने कोणी विष्णुलोकास गैले, कोणी कैलासास गेले, कोणी सत्यलोकास गेले, कोणी इंद्रलोकास गेले. याप्रमाणे दुसरी लढाई सात तासपर्यंत झाली. मोठे मोठे सरदारांहीं व शिपायांनी लढाईची शर्त केली. रक्तोदकें भूलिगास अभिषेक झाला आणि शिरकमलें हीच भलिगास कमलें अर्पण जाहली. मल्हारराव रामचंद्र त्या रणांत आक्रंदत पडले होते. ते दुःख त्यांचे चिरंजीव गणपतराव मल्हार यांणीं डोळ्यांनी पाहून, आपले पित्यास पुरे करून, आपण आपला शिरच्छेद करावयास उदित झाले. ते समयीं सदाशिवपंतांनीं पाहून सदगद होऊन उत्तर केलें कीं, “ आत्महत्या करू नये. उदईक सर्व आपण इंद्रसभेस जाऊ" असे म्हणून राहविले. सदाशिवपंताकडील व शत्रूकडील एकंदर माणूस पस्तीस हजार ठार पडलें ! दहा बारा हजार घोडा मोकाट फिरू लागला ! मदीमत्त हत्ती पाऊणशे रणप्रसंगीं पडले. इराणी दुराणी वगैरे शत्रूकडील उंट नफर दोन हजार कारखान्याचे जायां झाले. याप्रमाणे संग्राम महाधुरंधर जाहला. या युद्धांत बळवंतराव गणपतराव मेहेंदळे यांजवर वार पडला. त्यांचे मुद्यांवर मोठी गर्दी गुजरली. ते सदाशिवपेतभाऊंनी पाहून, घोड्याखाली उडी टाकून, दोहों हातीं पट्टे चढवून, जिवाची तमा न धरितां, धीट होऊन नीट फौजेत चालून घेतले. कत्तल करीत चालले. ते समयीं जनकोजी शिदे व त्र्यंबकराव मार्तड व सदाशिवपंत पुरंदरे व महिपतराव चिटणीस व (१) अरुता-आशा. (२) रवंदळ-चेंगराचेंगरी. (३) पुरे करून-पूर्णपण मारून. । । -55
पान:पाणिपतची बखर.pdf/67
Appearance