२० रघुनाथ यादव-विरचित शिपाईगिरीची शर्थ व्हावी म्हणून उमेदवारीने विरदं बांधून, शिरीं समले सोडून, घोड्यास जडावाचे अलंकार करून, एकाहून एक आगळे, जीवित्वास तृणप्राय मानणारे असे शहाण्णव कुळींचे मराठे घोड्यास नटनागर,२. जरीबादली पाखरा व शिन्या व सडकाव पायीं तोडर बांधून घोड्यांस थोपटून उभे राहिले. तसेच हवदे व अंबाच्या व नवरत्नांच्या मुक्ताभरणी झालरा याप्रमाणे गजभार सिद्ध जाहले. जंबुरे व हेकले व जेजाला, सुतरनाले व थोरली भांडीं एकूण आवाज दीड हजार, याप्रमाणे आराबा पसरून व बाणांच्या कैच्या उंटांवर लादून, बाण लावणारे सहवर्तमान, एकादांच सकल समुदायानिशीं सिंहनादं गर्जना करून रणास जावयास निघाले. |- १६. सैन्याचे चार भाग २ नंतर सैन्याचे चार भाग करून दक्षिणचे बाजूस खांसे विश्वासराव साहेब वीस हजार एकांड्यानिशी, त्यांचे डावे बाजूस मल्हारराव होळकर पचास हजार फौजेनिशीं, व पूर्वेस भाऊसाहेब साठ हजार फौजेनिशीं, व पश्चिम दिशेस जनकोजी शिंदे पन्नास हजार फौजेनिशीं, व उतरचे बाजूस तोफखाना साठ हजार पायदळासहित इन्नाईमखान गारदी याजकडील लोकांनीं मस्तकावर ढाला घेऊन नग्न हत्यारे करून, सावधतेने, जम्मस°०. = खातां, मांडीस भांडी देऊन, एक ११ घोडाराऊत न मिसळे अशा बेतान निशाणांचे फरारे सोडून उभे राहिले. १७. महाधुरंधर संग्राम === इराणी दुराणी व हस्तनापुरवासी व दिल्लीपत बादशाहा यांनी फौजेच्या नार टोळया के या. एक्या टोळीस खांसे अबदल्ली पन्नास हजार फौजेनिशा (१) समला-शेमला. पटक्याचे पदर, (२) नटनागर-नटलेले, (३) पाखरा-अश्वकवच. (४) शिरी-खोगीर नीट राहावे म्हणून लावलेले बरणस. (५) सडक-अश्वचामर. (६) तोडर-तोरड्या पाठभेद तोरड. (७) हेकले-रेकले तोफ. (८) आराबा-तोफखाना, (९) एकांडा-स्वतंत्र शिलेदार, (१०) जुम्मस-धास्ती. (११) नागपूर प्रत-एक राऊत व एक माणूस न फुटतां-शत्रूचा स्वार आपल्यात न येई असे. (-)
पान:पाणिपतची बखर.pdf/65
Appearance