Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर १९

एकदील होऊन, सर्वास स्तुतीने गौरवून नांवाजिले. तेव्हां थोर थोर सरदारांनी उत्तर केलें कीं, “ भाऊसाहेब महाराज ! आम्ही तरी जीवित्वाची तमा धरीत नाहीं. इराणीची कथा किती ? मारून गर्दीस मिळवून देऊ." हाच निश्चय सर्वांचा होऊन आपापल्या शिबिरास गेले.

१५. रणांगणाचा शृंगार
पहांटेची दोन तास रात्र उरली, तेव्हां सरकारी साहेवनौबत लढाई प्रसंगाची करून नकीबांस ताकीद करावयास सांगितली. नकोबांनीं सर्व लष्करांत फिरून ताकीद केली. प्रातःकाल होतांच तमाम फौजेसुद्धां सरदार शिलेपोस तयार होऊन आले. एकापरीस एक, भीमार्जुनासारिखे महावीर, दर-रिकिवीस तरवार गाजविणारे, अंगीं वीरश्रीची वारी, रणांगणाचा शृंगार करून, घुग्या व बखतरें व टोप व चिलखतें, विन्या व विरजे व वस्त्रे तकटी व मुक्तमाला व मस्तकीं तुरे व कलग्या व अंगींचे बारा अलंकार व जरोचे अबदागिरें करून शोभायमान, हातीं पट्टे व गुरगुज१० व फिरंगाणा ११ व बिचवे व कटारा व पेशकब्जे १२ व वाघनखें व भाले व कोयते व परिघ°3 व पट्टीश°४ व फरश १५ व गारभांडीं १६ व सांगा १७ व बरच्या व बंदुका कटितटीस शस्त्रसंभार बांधून आपआपलाले वाहनारूढ होऊन, अंगीं स्फुरणे अतिशय, युद्धास जावयास अति उदित, स्वामिसेवेशीं तत्पर, अशा आवेशाचे पुरुष हजारों हजार सिद्ध झाले. अनसूट १८ नव्या उमेदीचे

(१) साहेबनौबत-मोठा नगारा, डंका. (२) न कीब-भालदार चोपदार. (३) दररिकिबीस-रिकीब-स्वारी, वारंवार. (४) घुगी-राजव्यवहार, कोशातील अर्थ शिरस्त्राण; मोल्स्वर्थचा अर्थ-अंगत्राण-सर्व अंगाचे रक्षण करणारे. (५) बखतर-जाळीदार पोलादी चिलखत. (६) टोप-शिरस्त्राण, (७) बिनी-नासास्त्राण. (८) बिरजे-बाहुभूषण. (९) तकटी-वर्ख, जर. (१०) गुरगुज-गदा. (११) फिरंगाणा-फिरंगी तलवार. (१२) पेशकब्जकट्यार. (१३) परीव-लोखंडाचे गदेसारखे हत्यार. (१४) पट्टीश-पट्टा. (१५) फरश,-परशु कु-हाड. (१६) ‘व गारभांडी' हे शब्द पुणे प्रत १ व भिवंडी प्रत यात नाहीत. गारभांडी-गारेच्या चापाची बदूक. (१७) सांगानाला. (१८) अनसूट-अनुच्छिष्ट, ब्रह्मचारी,