१२ रघुनाथ यादव-विरचित कीं, “ या उपर बारग्यांची फौज चढून लढाईच्या उद्देशें आली असतां बेलाशक मोहरम करू यांत अंतर नाहीं. गलीम बहुत बदमस्त जोरावर जाहला. त्यास आम्ही यमुना उतरून पैल तीरास येतों. याप्रमाणे पत्रांचीं प्रतिउत्तरे लिहून सदाशिवपंत भाऊस वस्त्रे व घोडा व मोत्यांचा तुरा व जडावाची कंठी व शुभ्रवर्ण ऐरावतीतुल्य हत्ती, मुलतानी तरकस कमाना दोन, येणेप्रमाणे वकिलाबरोबर देऊन सदाशिवपंत भाऊच्या लष्करांत आले. १०. तवईचा वक्त गुजरला वकील रवाना केल्यानंतर अवदल्ली व सुजात दौले व मनसूर अली या त्रिवर्गानीं फौजेसहवर्तमान जीवित्वाचा संकल्प करून, दोन लक्ष सेनासहित तोफखाना मागे टाकून, पांच सातशे नावांचा पूल बांधोन लष्कर तमाम उतरू लागले. ते समयी तेथे बहूत मारामार जाहाली. बाग्यांकडील तोफखाना सुरू जाहाल्यामुळे इराणीकडील लोक फारच जायां जाहले. परंतु तितुका अग्नीचा पर्जन्य पिऊन, लढाईचा गुमान न धरित, इराणीकडील फौज दरोबस्त यमुना उतरून दक्षणतीरास आली. मागें कौरव-पांडवांचे युद्ध जाहलें तें पुराणोक्त थोर वक्ते सांगतात आणि श्रोते ऐकतात. ते वर्तमान प्रत्यक्ष पाहाणें प्राप्त जाहालें. कुरुक्षेत्रीं पश्चिमेकडे इराणीकडील सरदार फौजे निशीं व पूर्वेकडील बाजूस सदाशिवपंत बहादर सेनासहवर्तमान उभे राहिले. अघाडीपिछाडीस गोठास- गोठ भिडले. इराणी दगेखोर म्हणून सदाशिवपंत सावध रितीने राहिले. कामाठी व बेलदार१० आणून लष्कराभोंवती खंदक रुंद पंधरा हात व उंच दहा हात याप्रमाणे तयार केला. सवै। ད ར ང འད འ ་ (१) मोहरम-कत्तल. (२) गलीम-गनीम. (३) बदमस्त-बंडखोर. (४) तरकस-कमाना-तर्कश-बाणांचा भाता, कमान-धनुष्य, (५) जीवित्वाचा संकल्प करून–जिवावर उदार होऊन. (६) बारगे-लुटारू हा शब्द शत्रूने मराठ्याबद्दल वापरला तोच लेखकाने उचलला आहे हे खटकते. भाऊसाहेबांच्या बखरीत ‘गनीम' हा शब्द सर्वत्र असाच येतो. (७) गुमानपर्वा, (८) गोठ-सैन्याची छावणी. (९) कामाठी-लष्करात डेरे लावणारे मजूर. (१०) बेलदार-गवंडी. --- (८) -
पान:पाणिपतची बखर.pdf/57
Appearance