Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथ यादव-विरचित नाहीं. इराणीस पेश" होऊ न देता तुम्हीं व आम्हीं एकत्र होऊन, पेशजीचे उसने घेऊन अगदीं नेस्तनाबूद करावा. अबदल्ली इराणी मोठ्या उल्हासे मजल दरमजल येतो, त्यास ठायींचे ठायीं ठेविल्यास उत्तम आहे. इराणी यांणी लाहोर फत्ते४ केली. बादशाही सिहासने मोडीत चालिला. असे असता तुम्ही इराणीस आंग" दिल्हे, हे उत्तम केले नाहीं' म्हणोन बहुतां प्रकारे वकिलांनी बोध केला. परंतु सुजात दौले यांणीं व मनसूरअली यांणीं स्वहित न पाहतां न ऐकतां, पेशवे बहादूर यांचा व जाटांचा उपमर्द करावा हा दृढोत्तर विचार करून वकिलाबरोबर गुमचे बोलणे सांगून पाठविलें, तदनंतर सुजात दौले व मनसूरअली या उभयतांनी आपले वकिलाबरोबर सांगून पाठविलें कीं, “ रजपूत व जाट दिल्लीपत बादशाही चाकर असतां त्या बादशहाबरोबर बदमस्ती करितात, त्यांसही जरब देऊन व तुम्हीही बंॐ [ करून ] दरवर्षी या प्रांती येऊन बादशाही बळजोरीने कायम करू पाहतां, येविशीं तुम्हांस इजा द्यावी हा मतलब आमचा आहे. या परता दुसरा मतलब आमचा कांहीं एक नाहीं " याप्रमाणे आपल्या वकिलावरोवर भाऊसाहेबांकडे सांगून पाठविले आणि आपण वादशाही अनमतांत" रजपूत राजे व राजवाडे व पठाण वगैरे वागत होते, त्यास फिसात करून, आपणांस अनुकूल केले व चितोडकर राणे व उदेपूरकर १० व अमेरीकर व रामनगरकर व मारवाडकर असे एक मतांत आणन सदाशिवपंतांवर व जाटांवर वदनजर धरिली. ६. जाटाशीं बुद्धिवाद, जाट अविश्वासू । तेव्हां सदाशिवपंत अटीने फौजेसुद्धा दिल्लास दाखल जहाले. दिल्लीचा वस्त उभयतांनी ११ करावा हा विचार करून सर्वांची आणभाक क्रिया वलभंडार झाले की, इराणीस नेस्तनाबूद करावा. हा सिद्धांत करून जाट (१) पेश-वरचढ. (२) नेस्तनाबूद-नायनाट. (३) इराणी-अफगाणांचा वंश दुराणी. (४) फत्ते करणे, जिकणे. (५) आंग दिल्हे-हातभार लावला. (६) दृढोत्तर-पक्का, (७) बदमस्ती-बंडखोरी. (८) अनुमतात-संमतीते. (९) फिसात-फितूर. (१०) उदेपूरकर-हेही चितोडकरच. (११) उभयतांनी-जाट व मराठे यांनी.