पाणिपतची बखर दाणा वैरणीस कांही मुलुकांत बाकी राहिली नाहीं, सात आठ गांवची जागा मुक्कामास पाहिजे. सेनासागर दिवसेंदिवस अधिक उचंबळत चालला. पुढे जाट आदिकरून जे जे भुमे त्या प्रांतींचे होते तितके अनुकुळ जहाले चोहोंकडील फौजा मिळोन यमुनातटाकास सदाशिवपंत भाऊ दाखल जाहले. ४. इराणी आणावयाचा संकेत बुंदेलखंड व बंगाला येथील रजपूत यांनी व मांडलिक राजे यांनी आपलाले सरदेशी फौजा घेऊन, दोहींकडे अंग न देतां सलूख राखून, मित्रत्व संपादून आपआपले स्वस्थलास स्वस्थ राहिले. इराणीस किंवा सदाशिवपंतासही सामील जहाले नाहीत. तसे अंतर्वेदीकर जयसिंग यांणी आपली फौज दोघांसही कुमकेस न देता आपल्या स्वस्थानावर होते. हस्तनापुरवसी पातशहा यांणी बदनजर धरून, इराणी व आपण एकत्र होऊन दक्षिणी फजिचा उपमर्द करावयाचा विचार आरंभन मनसूरअली५ व महमदखान व भोलीभुजसिंग राजे अयोध्येचे यांणीं व सुजात दौले या सर्वांनी कूमती कथून इराणी आणावयाचा संकेत केला. ५. सुजात दौला याजकडे वकिली हा मजकूर तपशीलवार सदाशिवपंतांस कळला तेव्हां सदाशिवपंतांनी सुजात दौला याजकडे मातबर ७ माणूस वकिलीस पाठवून बोलणे घातलें कीं, | मागे अवदल्ली इराणी बेइमानी होऊन बादशाहीचा हास केला. दिल्लीपत बादशाहीत बाकी राहिली नाहीं व तुम्ही व मनसुरअली मिळोन ३णसि घेऊन येतां ही गोष्ट अनुचित, यांत काही ताजकी° होतां दिसत ག་ར་་་ (१) भुमे-त्या देशचे रहिवासी. (२) नागपूरप्रत-सरहद्दीस. (३) पात"हा-आलमगीर दुसरा. (४) बदनजर-वाईट दृष्टी. (५) मनसूरअलीसफदरजंग. नजीबखान रोहिला याच्याबद्दल ग्रंथकाराने चुकीने हे नाव घातले ह. पुढेही हाच उल्लेख आहे. (६) कुमती कथून-कट रचून. (७) मातबरप्रतिष्ठित. (८) भिवंडी प्रत हाराष-हास वरून हाराष. भाऊसाहेबांच्या अति अनेकदा 'गनिमांचा हर्षकाल ' असे आले आहे, (९) ताजकी मलेपण.
पान:पाणिपतची बखर.pdf/50
Appearance