Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कपाणिपतची बखर जामदार बादशाही सलतान्यांतील१ होते त्यांस सांगितलें कीं, " आमच्या सलतान्यास खर्चास पाहिजे सबब बादशाही जामदारखान्यांतून खजीना देववावा." असे बोलणे पडतांच जाट [याने] चित्तांत समजून उत्तर केले वी, " बादशाही खजीना हुकमाबिगर खर्च करावयाचा नाही. तुम्ही लुटावयास सिद्ध जहाले असता पुढे मागें आम्हांस नामोशी येईल" असा घाट बोलण्यांत आणून जाटानें फेरबदलीची गोष्ट सांगितली की, " आम्ही बादशाही चाकर बहूत दिवसांचे असतां, आमचे डोळ्यांदेखत ही गोष्ट घडावी, । रात आम्हां जाट-रजपुतांस अनुचित. बादशाही तक्त आमचे आम्हीं रक्षावे. यथं एकनिष्ठपणे वर्तावें. हुकमाबिगर खजीना फोडावयास दक्षणी बारग्यांची फीज आली असतां बेलाशक तरवार चालेल आणि तुमचा आमचा भाईपणा राहाणार नाही. आम्ही बादशाही पूर्वापार चाकर तुमचे एकंदर ऐकणार नाही या उपर समजोन राहाणें." अशी भाषणे नोकेझोकेचीं जाटांनीही भाऊसाहेबांकडे सांगून पाठविली. ती सर्व भाऊसाहेबांनी श्रवण करून सावध जहाले आणि चित्तांत समजलें कीं, जाटाचा विश्वास नाही. हा कार्यवाद् समयास फिरून पडेल. आम्हांस हाच शत्रू याची भरंवसा नाही. तेव्हा १ोत्तर विचार करून मनोथारणास्तव भाऊसाहेब यांनी उत्तर सांगन ठविले की, '* तुम्हांस जें मान्य तें आम्हांसही मान्य." असे सदाशिव पंत भाऊ यांणीं व मल्हारजी होळकर यांणी सांगून पाठविलें. * यांत अणमात्र फावत नाही. या उपर तुम्ही कराल तेच प्रमाण, ही खातरजमा असों . बादशाही कायम करावी आणि शत्रूचा पराभव करावा. मागे फसाइतामळे- बब बेगम यांणीं बादशाहीचा नाश बहत केला आणि सगळी बादशाही बुडविली. कांहीं स्वहित पाहिले नाहीं. बेटी१० ६ऊन इराणी शेर ११ केला. अटकेपार होऊन हा काल पावेतों आला ग ___(१) सलताना-फौज. (२) नामोशी-नामुष्की, बेअब्रु. (३) बारगे ६. उत्तर प्रांतांतील लोक मराठ्यांना बारगे म्हणत. (४) तरवार चालणेयुद्ध होणे. (५) नोकेझोकेची-खोचक. नागपूर प्रत व पुणे प्रत २-निष्ठुर, (६) कार्यवादू-कार्यसाधू. (७) तफावत-अंतर. (८) फिसाइत-फितूर, (९) बुबुबेगम-महमदशहाची बायको मलकाजमानी. (१०) बेटीचंदाजमानी अबदालीपुत्र तैमूरशहाला ही दिल्ली. (११) शेर-वरचढ्. । =