रघुनाथ यादव-विरचित धारकरी शिवाय सरदार, याप्रमाणे फौजेचा जमाव करून रवानगी केली. गंगाफार होतांच नबाबांनीं कटकट काढिली. त्यांचे पारिपत्य करून, चवसष्ट लक्षांचा मुलूख सोडवून पुढे नर्मदेपार गेले. तो फौजेचा तळ उज्जनी पावेतों पडत चालला. त्या प्रांतींचे जे जे सरदार व अप्पाजीराव व अंताजी माण. केश्वर वगैरे पतके होते ते येऊन भेटले. संपत्ति-दारा-मित्र भावे करून अनुकूल जाहले. वरचेवर आला स्वार घोडाराऊत ठेवीत चालले. क्षिप्रापार होऊन मजल दरमजल पुढे चालले. हजिरी गणतीस एकंदर लहान थोर सरदार मिळून साडेतीन लक्ष घोडेराऊत जमले. याखेरीज पायदळ साठ हजार. ऐसा एकंदर जमाव जाट व मराठे आदिकरून सव्वा चार लक्ष फौज गणतीस लागली. राजश्री मल्हारराव होळकर यांचा तोफखाना जरबा सुमारे ३०० तीनों व सरकारी तोफखाना बरोबरचा सुमारे ४००. या खेरीज उज्जनीतील व पायगडांतील व झाशीतील व नरवरांतील मिळोत समारे ५०० पांचथे. ऐसा तोफखाना जरबा सुमारे १२०० वारा. या खेरीज जेजाला व सुतरनालाई फूठमढिया एकूण आवाज दोन हजार व बाणांच्या च्या सुमारे ४०,००० चाळीस हजार, शिवाय दारूगोळा. पुरें सामान. शिलेपोस१० करून, शहाण्णव ११ कुळींचे मराठे जमा करून. अंगी ज्यांच्या मर्दमी, समशेरबहादूर, रणपंडित. रणधुरंधर, याजप्रमाणे फौजेचा बंदोबस्त करून, दिल्लीचे सुमारे सदाशिवपंत परम तवेशे १२ करून हर्षभरित चालले अंतर्वेदीपासून तहत बंगाला आदि करून बादशाहीगिरीचा पेशजीचा १३ खालीसा अंमल मुलुक मारून देक्षण राज्य केले. इतक्या लष्करास खर्चास व (१) धारकरी-वीर पुरुष. (२) गंगा-गोदावरी. (३) पतके-१०० वारांचे एक पथक, त्यावरील सरदार. (४) जरबा-नग. (५) जेजाला-लांब नळीची फिरवता येणारी बंदूक. (६) सुतरनाला-उंटावरील तोफ. (७) भिवंडी प्रत फूटम ढिया पुणे. प्रत १ फटमडलिया नागपूर प्रत व पुणे प्रत २ फटकडिया-हा पाठ बरा अर्थ फटाके. (८) आवाज-नग. (९) कैच्यादारूच्या २४ बाणांची जुडी. (१०) शिलेपोस-तयार. (११) ब्रह्म, शेष, सूर्य आणि सोभ या ४ वंशांची प्रत्येकी २४ कुळे. (१२) तवेश-त्वेष, (१३) पेशजी-पूर्वी, मागे.
पान:पाणिपतची बखर.pdf/49
Appearance