Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथ यादव-विरचित मागे सकल पृथ्वीचे राज्य करणें तें तुम्हांशिवाय राज्यास धणी कोणी दिसत नाहीं." असे सांगून महाराज कैलासभुवनास गेले. मागे राजश्री नानासाहेब व भाऊसाहेब यांणी आपल्या पराक्रमाने अटकेपर्यंत मुलूक काबीज केला. बारा वर्षे सकल पथ्वीचे राज्य केले. राज्याचा उदय दिवसेंदिवस होत । चालला. सर्व प्रांतांतील किल्ले कोट व महादुर्गे सोडविलीं. एक सत्ता केली. मांडलिक राजे सेवक होऊन दास्यत्व करू लागले. असा पराक्रम थोर, सर्वा विशेष, जाहला असता, त्यास पुढे होणारे भविष्य बलवंत, याजकरिता राजश्री नानासाहेबांस बुद्धी जहाली जे, राजश्री भाऊसाहेबांस हिंदुस्थानांत फौज देऊन रवाना करावे. ते समयीं राजश्री महादाजीपंत पुरंदरे याहा श्रीमंत महाराज यांस विनंती केली की, “ भाऊसाहेबांस एकंदर हिंदुस्थानचे मोहिमेस पाठवू नये. भाऊसाहेबांचे कारभाराचा हावभाव दुसरे कोणास येणार नाही. सर्व राज्याचा भार त्यांजवर आहे." असे कित्येक प्रकार सांगितले. ते समयीं श्रीमंत राजश्री नानासाहेब यांणीं उत्तर केले की, * भाऊसाहेबांचे चित्तांत स्वारीस जाण्याचे आहे, याजकरिता त्यांस पाठवितों. त्यांचा मानस फार दिवस आहे याजकरितां येविशीं स्वारी करून आले म्हणजे सर्वांची खातरजमा ४ होईल. " तेव्हां महादाजीपंत पुरंदरे यांणीं उत्तर केलें कीं, 4 कैलासवासी चिमाजी आपा यांणीं पूर्वी बहुत पराक्रम केला. त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब, हे लढाईस मागे हटणार नाहीत. शत्रूस पराभवितील किंवा आपण कैलासवासी होतील. त्यात सहसा अन्यथा नाहीं, याजकरितां त्यांस सहसा६ पाठवू नये." ते समयीं सौभाग्यवती गोपिकाबाई-साहेब यांणीं अनुमोदन दिले की, त्यांस रवाना केले पाहिजे. सवव दढ़ निश्चय करून, मागील पराक्रम मनांत आणून पुढेही रूमशाम७ येथे स्वराज्य करणे हीच उमेद भाऊसाहेबांचेही मनात आहे, दुसरा निजध्यास नाहीं; इराणीही अटकेपार होता तो अटकनदी उतरून अलीकडे आला, त्यास अटकेपार घालवावा या कारणास्तव राजश्री सदाशिवपंत भाऊ व ད་རང་ང་ (१) अटक-सिंधुनद. (२) एकंदर-मुळीच. (३) हावभाव-धमक. (४) खातजमा-खात्री. (५) सहसा-बहुधा. (६) सहसा-घाईने. (७) रूमशाम-कॉन्स्टेंटिनोपल. (८) निजध्यास-निदिध्यास..