Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

FETY । रघुनाथ यादव-विरचित: पाणिपतची बखर. को ॥ श्रीगणपती प्रसन्न ।। २ ।। १. वर्तमान विदित व्हावे आज्ञा श्रीमंत महाराज मातोश्री गोपिकाबाई-साहेब मुक्का शहर पुणे साहेबांचे सेवेसी. आज्ञाधारक रघुनाथ यादव लेखक दिमत" चिटणीस कृतानेक साष्टांग दडवत. विज्ञापना तागाईत४ छ५ जमा दिलाखरः पावेतों सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष, नवो खबर श्रीमंत यांजकडून वर्तमान आजपर्यंत ताल ते विदित व्हावे म्हणन आज्ञाधारकास आज्ञा जाहली. त्यास यथामतीने निवेदन करितो. श्रवण केले पाहिजे. | २. भाऊसाहेब यांची हिंदुस्थान प्रांतो रवानगी । यथापूर्वक कथन. श्रीमंत महाराज राजश्री शाहू महाराज छत्रपती यांणीं वामास जाते समयीं राजश्री नानासाहेबांस व भाऊसाहेबांस सातारियाचे S'मा समक्ष बोलावन आणन, सर्व निरवानिरव करून, शिक्केकटार हाला करून, मस्तकी वरदहस्त ठेविला. आणि आज्ञा जाहली जे, " माझे नमस्कार. या शब्दावरून लेख (१) दिमत-तावा, (२) चिटणीस-सरकारी कारकून. (३) दंडवत • या शब्दावरून लेखक परभ होते असा तर्क का. ना. साने यांनी ला आहे. (४) तागाईत-पर्यंत. (५) छ-मुसलमानी दिनांक निदर्शक. (६) नादिलाखर-अरबी वर्षाचा ६ वा महिना (७) पुणे प्रत २ मधील पाठ श्री नानासाहेब व भाऊसाहेब हे त्या ठिकाणीच होते ते समयीं नाना । बोलावून आणिले आणि गळयात शिक्के घातले आणि