(३३) पौराणिक दाखले : | पौराणिक दाखल्यांची योजना, उपमा, दृष्टांत, उत्प्रेक्षा या अलंकारासाठीं पुराणांतील उदाहरणांचा बापर ही रघुनाथ यादवाच्या निवेदनाची लकब लक्षणीय आहे, युद्धवर्णनांत रघुनाथ यादव ' कलियुगीं दुसरे प्रत्यक्ष भारती युद्ध जाहाले' असे म्हणतो. ‘ रामरावण यांच्या युद्धासमान युद्ध जाहलें ' भाऊंनी ‘ प्रताप कणप्रिमाणे केला' अशा उपमा तो चापरतो, भाऊंना सरदार सांगतात, ‘ विनाश कालासारखी बुद्धी जाहाली. होणार त्यासारखी बुद्धी होते त्या वेळीं नलराजा श्रीरामचंद्र, रावण आणि दुर्योधन यांनी दूर्बद्धी झाल्यासळे संकट कशी ओढव न घेतली याची उदाहरणे दिली जातात ( पृ. २९-३० ) विश्वासराव जेव्हां नानासाहेब व भाऊसाहेब यांतील बंथ भाव व्यक्त करतो तेव्हा आपण उभयता वंध एक धर्मराज, एक अर्जुन, एक श्रीरामचंद्र, एक भरत' असा उल्लेख येतो. भाॐ कल्पांतीचा आदित्य भासला ही उत्प्रेक्षा, रक्तोदके भूलिगास, अभिपक, शिरकमलें भूलिगास अर्पण ही रूपके पौराणिक थाटाचीच आहेत. 1) शोक, दुःख, वैराग्य या भावनांचा अविष्कार करतांना रघुनाथ यादव चटकन रामायण, महाभारत यांतील दाखले देतो. विश्वासराव यावर तो भाऊंचे दुःख वर्णन करतो. ‘श्रीराम अयोध्यापूर सोडन वनवासांत जावयास सिद्ध जाहाले तेच वर्तमान ऐकतांच दशरथाने केयाच्या मंदिरांत अतधन केले तसेच भाऊसाहेब जाहले ( पृ. ४१ ) भाऊसाहेबांच्या निधनाची वार्ता कळल्यावर नानासाहेबांना अतीव दुःखाने वैराग्य आले त्यासाठी ‘रामचंद्रासाठीं भरताने अयोध्यापूर सोडून नंदिग्रामी "*" नदियवते उदास जाहाले तद्वत ( प. ४४ ) असा दाखला रघुनाथ चदिव देतो. कौरवपांडव क रुक्षेत्रीं धारातीर्थी सुस्नात जाहले तदनुरूप "महा व्हावे' अशी उठावणी भाऊ करतात. समरांगणीचे वीरश्री वैभव पाहण्यास ‘ स्वर्गी इंद्रलोकीचे इंद्र सूद्धां सुरगण विमानांत बसून अंतराळ
- असे पौराणिक धतींचे निवेदन येते. पौराणिक सृष्टीतील ही उपदाखले परिचित असल्यामुळे त्यांतील संदर्भ ताबडतोब मनाला