Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३) रघुनाथ यादवाने नाट्य निर्माण केले आहे. विश्वासरावाला गोळी लागून तो पडल्यावर आतां भाऊसाहेबांची प्रतिक्रिया काय होणार अशी सहजच उत्कंठा निर्माण होते. तेथे प्रथम परम दुःख, नंतर होळकरास पुण्यास जाण्याची आज्ञा करणे, नानासाहेबांना निरोप पाठविणे, ‘आतां लोभ असो द्यावा' म्हणणे आणि सरदारांनीं गंगाकाठी छावणी करण्याची सूचना केली असता ती नाकारून रणांगणांत उडी घेण्याचा कृतनिश्चय करणे असे चढत्या पायरीचे निवेदन बखरकार करतो. व खरकाराच्या या प्रभाव। गतिमान निवेदनांत घटना जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे. । भाषाशैली : रघुनाथ यादवाची डौलदार प्रभावी भाषाशैली बखरीतील निवेदन परिणामकारक होण्यास कारणीभूत झाली आहे. युद्धाच्या वीरश्रीच्या वर्णनांत यांतील लघु वाक्यार्धानी गतिमानता व ओघ यांची जोड मिळते, तर ध्वनिवाहक शब्दांच्या योजनेने आवेश, ओज यांचा परिणाम साधला जातो. युद्धास तोंड लागले त्यावेळचे पुढील बर्णन पहा · दारुण संग्राम जाहाला हवद्यास हवदे, राऊतास राऊत एकमेळ जाहला... एकच रणधुमाळी दोन्ही सैन्यांत माजली. धुरे करून दिनमणीचा अस्त जाहाला असा भास । पडला, घे धे हीच गर्जना उठलो. उमास घ्यावयास अवकाश पडे ना पुढचा पाय पुढे कोणास कोणी हरेना ( पृ. ३७ ) दुस-या लढाईचे वर्णन या शैली मुळे असेंच प्रभावी झाले आहे. ( पृ. २१-२२ ) मराठ्यांची • हरहर महादेव' ही गर्जना इराणीकडील लोकाची या · अल्लख्दा या रहिमान रहीम ' ही गर्जना हत्यारांचे चपेटे, मल्लयुद्धांचे मारणे, महाकाल, कृतांत यांची स्मृती, रणभूमीवरील मूच्छित रक्तबंबाळ वीर, शरीरे चिरडलेली, हातपाय तुटलेले, भाला हृदयपार झालेला याचे विस्तृत वर्णन रघुनाथ यादव प्रत्ययकारी करतो. ' आपआपले पुण्याने कोणी विष्णु लोकास गेले, कोणी कै लासास गेले, कोणी सत्य लोकास गेले, कोणी इंद्रलोकास गेलें, गासारखी डौलदार वाक्यरचना रघुनाथ यादवाने येथे मार्मिकतेने योजिली आहे.