Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) भिडत असले तरी रघुनाथ यादवाने काव्य सौंदर्याचा शिडकावा करणारी ग्रीष्मांत चमकणाच्या विद्युल्लतेची जी उपमा (पृ. ४३ ) भाऊंना दिली आहे तीच अधिक स्मरणांत राहते. व्यक्तित्वाविष्कार : मन मराठ्यांच्या थंबलेले हृदय बसष्ठा आणि ईश्व सांबकृपा' पाणिपतच्या बखरीतील कलात्मकतेचा महत्त्वाचा पैलू म्हणजे तींत रघुनाथ यादवाचा होणारा व्यक्तित्वाविष्कार होय. गोपिकाबाईच्या आज्ञेवरून ही बखर त्याने रचली असली तरी स्वतःच्या विशिष्ट दृष्टिकोणाचा वापर त्याने निवेदनांत केला आहे, हे उघड आहे. पानिपतच्या संग्रामानंतर लवकरच ( २ वर्षांनी ) ही बखर लिहिली असल्यामुळे त्या संग्रामाकडे तटस्थपणे वा चिकित्सकपणे पाहण्याची, त्यांतील घटना व यशापयश यांच्या मूल्यमापनाची भूमिका साहजिकच बखरकार घेत नाहीं. संग्रामवर्णन स्वकीयांच्या बाजूने करणे ही त्याची स्थूल भूमिका आहे. बखरकाराचे मन मराठ्यांच्या शौर्याने, त्यागाने हेलावले आहे. त्यांची दुर्दशा पाहून कळवळले आहे. हे ओथंबलेले हृदय वखरीत अनेक अंगांनी ओसंडले आहे. रघुनाथ यादवाची छत्रपतींबद्दलची निष्ठा आणि ईश्वरावरची श्रद्धा * छत्रपतींचा पुण्य प्रताप वरदहस्त । महाराजांचे पुण्य ' ' सांबकृपा । * कैलासनाथाची सत्ता' या उद्गारांतून व्यक्त होते. दैववादाचा पाठपुरावा तर रघुनाथ यादव पुष्कळ ठिकाणीं करतो. प्रारंभीच तो ' पुढे होणार भविष्य बलवंत ' म्हणून नानासाहेबांना भाऊंना पानिपतावर पाठविण्याची बुद्धी झाली असे सुचवितो. भाऊंना हेका केला म्हण न दोष देणारे सरदार · नकळे ईश्वराचा महिमा ! होणार त्या सारखी बुद्धी उत्पन्न होते' अशी पुस्ती जोडतात उलट भाऊही त्यांची समजूत घालतात * होणारास उपाय काय ? कोणी आपण आपले अनिष्ट चिंतीत नाहीं. दैवगतीने घडून आल्यास उपाय कोणाचा ?' बिश्वासराव म्हणतो, ‘ जे ईश्वरानें नेमिले असेल ते कदापी टळावयाचे नाहीं " असा दैववादाचा प्रभाव येथे जाणवत असला तरी दुबळेपणा मात्र येथे नाहीं. भाऊसाहेब, विश्वासराव यांची क्षात्रर्घर्माचा पुरस्कार करणारी वाक्ये लिहिताना