Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१) मुक्तलडांच्या झालरी व गळ्यांत रुप्याच्या घंटा व रुप्याच्या वांकी, तोड पायीं, रुप्यासोन्याच्या अंबाच्या हत्तीवर ठेवून चौफेर मोत्यांचे घोस लादलें ते मदोन्मत्त वारज विलोकिता केवळ सुरेश्वरांचे ऐरावत भासले' (पृ. ३४) भाऊंचा कृतनिश्चय आणि रणांगणांतील त्यांचे तेजस्वी दाहक रूप यांचे हे चित्रण पहा- सदाशिवपंत भाऊ खासे अंबारीत बसून खांवास नवरत्नांचे फर्श बांधिले. कारण कीं, संपूर्ण वसुंधरचे राज्य करीन किंवा इंद्रपदीचे धेईन. अंधारींत बसतांचे सर्व शरीर लाल जाहालें व नेत्रही आरक्त जाहाले. त्या समयीं भाऊ कसा भासला कीं, केवळ कल्पांतीचा आदित्य !.- ... (पृ. ३५-३६) पाणिपतच्या बखरींतील ही वर्णने म्हणजे बखरीला समृद्धी प्राप्त करून देणारी, तिच्या कलावैभवांत भर घालणारी संपदा आहे. निवेदन कौशल्य : पाणिपतच्या बखरींत रघुनाथ यादवाचे निवेदनकौशल्यही दिसून येते. बखरींतील निवेदन प्रवाही तर आहेच, पण त्यांतील आकर्षक मांडणी, उत्कंठा व कुतूहल वाढविण्याची पद्धती आणि नाट्यमयता आपले लक्ष वेधून घेते. सुजाउद्दौला व जाट यांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांनी केला. त्यावेळचीं मुद्याला नेमका हात घालणारी भाषणे किंवा इराणीतर्फे वकिलीचा प्रयत्न झाला तेव्हां भाऊसाहेबांवर ( मराठ्यांवर । केलेले आरोप ‘ सर्व बादशाही तुम्ही मराठ्यांनी बेकैदी करून बुडविली’ आणि ‘ ही गोष्ट तुमचे खातरीस न येई तरी लढाई करावी लागेल' अशी दिलेली धमकी नाट्यपूर्ण आहे. भाऊसाहेबांनी इराणीच्या वकिलांना दिलेला अहेर...’ आम्ही तुम्हांस एकंदर दबून रहाणार नाही. तुमचे हुकूमाची तमा धरीत नाहीं. लढाई करावी हाच आमचा निश्चय आहे' तितकाच प्रभावी आहे. संवादयोजनेमुळे हे वकिलीचे प्रयत्न, त्यांतील कावेबाजपणा, एक • मे कावर बाजू उलटविण्यांची कोशीस या गोष्टी नजरेत भरतात. पानिपत संग्रामाच्या वर्णनांतन्हिी बाजूची तयारी, रणधुमाळी कधी लाभणारा विजय तर कधीं ध्यावी लागलेली माघार यांचे उत्कंठावर्धक निवेदन घखरीत येते. सरदारांनी भाऊंवर केलेले वाक्प्रहार आणि ते झेलून सरदारांना युद्धास प्रवृत्त करण्याचा भाऊंचा यत्न येथे अशीच संवादयोजना करून