Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०) निर्देश बसरकार जातां जातां करतो. संग्रामाचे वर्णन प्रत्ययकारी होण्यास या समुदाय चित्रांचा मोठाच हातभार लागला आहे. वर्णनकौशल्य : रघुनाथ यादवाची बखरीतील यथातथ्य रेखीव वर्णने हाहि त्याच्या कलात्मकतेचा मनोज्ञ आविष्कार आहे. सूक्ष्म निरीक्षण आणि कल्पकता दोन्हींचा मिलाफ झाल्यामुळे पाणिपतच्या बखरींतील विविध वर्णने चितवेधक उतरली आहेत कांहीं खास शब्दप्रयोग, चलचित्राप्रमाणे प्रवाही गतिमान वाक्यरचना यांच्या माध्यमांतून रघुनाथ यादव आपल्या डोळयापुढे प्रत्यक्ष चित्र उभे करतो. ‘रणांगणाचा शृंगार'- करून मराठे रति जावयास निघाले त्या वेळचे वर्णन याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अंगों वीरश्रीची वारी असलेले हे ' भीमार्जुनासारखे महावीर ' चिलखत, टोप घालून हातात कमरेला शस्त्रे बांधून कसे सज्ज झाले याचे विस्तत वर्णन पारिभाषिक शब्दांचा योग्य वापर करून येथे केले आहे, त्यांचा आवेश आणि उत्साह यांचे हे वर्णन पहा - अंगी स्फुरणे अतिशय युद्धास जाव -.. यास अति उदित, स्वामी सेवेंशीं तत्पर अशा आवेशाचे पुरुष हजारोहजार सिद्ध जाहाले' (पृ. ३९) युद्धानंतर सैन्याची आणि लोकांची दुर्दशा झाली तिचे रघुनाथ यादवाने पुढीलप्रमाणे चित्रण केले आहे. ' खंदक भरल्याबर जे लोक भिकारी होऊन अन्न अन्न करीत दुसरा देश धरून पुण्यास आले ते आले.. हजारोहजार त्या कुरुक्षेत्री रणमंच कीं निजलेच राहिले. (पृ. ४३) शेलके घोडे, शेलके साहित्य, सोनपत, पानपत वगैरे ठिकाणीं सर्वस्व बुडालें, कितीएकांची घरे बसली, कितीएकांच्या नकला जाहाल्या, किसीएक हातापायांनी अधू जाहाले, गंगाप्रवाही व यमुनाप्रवाही कितीएकांनी घालून घेतले.' (पृ. ४६-४७ ) भयंकर दैन्य, वाताहत, सर्वस्वनाश यांचे हे बखरीतले वर्णन वाचल्यानंतर अंगावर शहारे येतात. रणांगणावर नेण्यासाठी सजविलेल्या हत्तीचे वर्णन उठावदार, रेखीव वस्तुवर्णनाचा नमुना आहे. ‘ पंचरंगे करून चित्रविचित्र श डादंड मस्तकावर रेखिले व बादली पाखरा गजपुष्ठीवर घालून सुवर्णमंडित पिंपळवने