Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७)

  • रूमशाम येथे एकछत्री राज्य करावें चतुः समुद्रपावेतों पृथ्वी पादाक्रांत करावी ही इच्छा (तुमची)' स्वतः भाऊसाहेबांनीं जाट अणि इराणीचा वकील यांना जो प्रत्युत्तरे दिली आहेत त्यातून निधडेपणा आणि आत्मविश्वास, स्वाभिमान आणि श्रद्धा यांचे आगळेच मिश्रण दृष्टीस पडते ‘आम्ही फरजंद लहान माणूस न हों ... इराणीचा हिशेव कोण धरितो ?' असे बेदरकारपणें म्हणणारे भाऊसाहेव ‘ जे बदनजर धरून वर्तणूक करितील त्यास त्यांचा के स्वामी पाहून घेईल' अशी श्रद्धा व्यक्त करतात. ' श्रीमंत छत्रपती महाराज सातारकर, त्यांचा जयप्रताप विक्रम पराक्रम वरदहस्त आमचे मस्तकी आहे. सर्व धरित्रीचे राज्य स्वामिकृपेने संपादितो.' (पृ.१८) येथे श्रद्धेला आत्मविश्वासाची जोड मिळाली आहे.

जाट आणि सुजा यांच्याशीं वागतांना भाऊचे व्यवहारचातुर्य दिसते: जाट कार्यवाद्, अविश्वासू याची खात्री पटली असतांहि ते त्याला ‘इमानी' म्हणून चुचकारतात. दोघांत विकल्प आला असता बाहेर दिसू देत नाहीत. बेइमानी इराणीशी हातमिळवणी केल्याबद्दल सुजाला दोष देऊन झाल्यावर * तुम्ही व आम्ही एकत्र यावे' म्हणून पाचारण करतात. सरदारांशी असणारे भाऊंचे संबंध केवळ व्यवहारो नसून जिव्हाळयाचे आहेत. लढाईचा निश्चय झाल्यावर भाऊसाहेवांनीं सरदारांना ' मनोधारणेची बोलणी बलूिन, वक्षिसे देऊन, सर्वास स्तुतीने गौरवून नावाजले' आणि आत्म-- विश्वासांत घेतले. सरदार :नी ' या हट्टाने सर्वं लयास गेले. तुम्ही सर्वांचा घात केला । असः दोषारोप केला असता भाऊसाहेव शांतपणे दैवगतने। घडले असे समजाव न · दूषणे लादिना ती प्रमाणच' असा धोडासा नमीपगा घेऊन पुढच्या कायकिडे सरदारांचे मन वळवतात. यश छत्रपतींचे भाळावे हे यश तुम्हा समस्तांचे आहे' अशी प्रेरणा त्यांच्यात निर्माण करतात. निदान से नयीनी भाऊाहेबांची हांक ‘ अत्र भक्षिले त्याचे अज सार्थक करून दाखवावे......यश किवा अयश हे तुमचे तुम्ही सांभाळावें । iण लढाईत जखी झालेल्गांची त्यांनी केलेली उस्तवारी त्यांची आपुलकीची भावनाच उड करते. या जिव्हाळ्यामुळे व सरदारही त्यांना एकदिने साथ देतात.