(२८) भाऊसाहेबांचा क्षात्रधर्म म्हणजे या सर्व गुणांच्या शिखरस्थानी असणारा पैलू होय. याचा आविष्कार तर बखरकार मोठ्या तेजस्वी शब्दांत करतो. “ शरीर तृणप्राय मानून, मर्दुमीचा हिय्या न सोडितां, समशेरीची शर्थ करून दाखवावी. सत्कीर्ती करून मरावे या भूषणापरतें दुसरे काय आहे ? । आम्ही तरी सतीचे वाण घेतले' अशी भाऊसाहेबांची निष्ठा आहे' या निष्ठेमुळे एक प्रकारचा करारीपणा, कडवेपणा त्यांच्यात आला आहे. विश्वासराव रणांगणांत गोळी लागन पडल्यावर भाऊसाहेबांची पहिली प्रतिक्रिया जरी दुःखाची असली तरी नंतर भावनावे ग संपल्यावर ते कर्तव्यजागत होतात आणि मल्हारराव होळकराला पुण्यास कुटुंब घेऊन जाण्यास सांगतात. शत्रूनी पिच्छा पुरवला तर ' कुटुंबाचा शिरच्छेद करावा परंतु शत्रचे हातीं जिवंत लागू देऊ नये' अशी सूचना देतात. यानंतर निकराने शत्रूशी लढा देण्याचे ते ठरवितात. ‘वडिलांचे भेटीस आपण जावें के अयोग्य' अशी त्यांची भावना होते आणि जिवावर उदार होऊन ते। रणांगणांत उडी घेतात. (पृ. ४१-४२) पानिपतसंग्रामांत केंद्रीभूत ठरणारे भाऊसाहेबांचे व्यक्तिचित्र याप्रमाणे विविध पैलू दर्शवून, भाऊसाहेबांची कृती, उक्ती त्यांचे विकारविचारे अशा विविध छटांनी त्यांत रंगभरणी साधून रघुनाथ यादवाने विशेष रंगतदार बनविले आहे. इतर रेखाचित्रे : पाणिपतच्या बखरींत विस्ताराने रंगविलेले व्यक्तिचित्र फक्त भाऊदेवांचेच आहे. इतर व्यक्तींची केवळ रेखाचित्रे व खरकार काढतो. पण व्यक्तीच्या मोजक्याच उद्गारांतून त्याचे व्यवतीमत्व लीलया उघड करण्याचे कसब रघुनाथ यादवाने येथे दाखविले आहे. भाऊसाहेव विश्वासरावावद्दल तुम्हास मी मरणाचे घरीं आणिलें' म्हणून विव्हल झाले असतां विश्वासराव जी त्यांची समजूत घालतो ती खरोखर करुण तितकीच * दात आहे. तुम्ही उभयता बंधू कायम असल्यास माझे सारखे पुत्र : हुत
पान:पाणिपतची बखर.pdf/36
Appearance