Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६) संग्रामवर्णनांत वीररसाने स्फुरण पावणापी बखरकारांची लेखणी दु:खद प्रसंगांत तितकीच हळुवार बनते. तिच्यांतून कारुण्य पाझरू लागते. पानिपतवरचा निदान समय जवळ आला असतां भाऊसाहेबांना विश्वासराव लहान असतांना त्याच्यावर दुर्धर प्रसंग आपल्यामुळे आला असे आवेगाने बाटते आणि ते विव्हल होतात. पाषाणहृदयी माणसालाहि द्रवविण्याचे सामथ्र्य यावेळच्या भाऊसाहेबांच्या उद्गारांत आहे. ' विश्वासरावसाहे तुमचे वय लहान, तुम्ही सुखाची जाती तिलप्राय अनुभवली नाहीं... तुम्हांस मी मरणाचे घरी आणिले.' (पृ. ३१) भाऊसाहेबांचा अंत झालेल कळल्यावर नानासाहेबांनी केलेला शोकहि असाच हृदयद्रावक आहे. भाऊसाहेबांन' मला मागे टाकून आपण स्वर्गवास केला. माझी अंधळ्याची झाठी चोरून नेली. माझे घनाचा चरु कोणी चोरून नेला तो कळेना. झाढां देहत्याग करावा अथवा संन्यास घ्यावा (पृ. ४४) भाऊसाहेब आणि नामदेव यासारख्या थोर, वीर पुरुषांच्या अंतःकरणातही मार्दव कसे मत असते आणि वात्सल्य, भ्रातृभावं यामुळे प्रसंगीं ते कसे द्रवतात याचें हें। उत्कट वर्णन रसिक मनाच्या अगदीं गाभ्यापर्यंत जाऊन भिडते. भाऊसाहेबांचे व्यक्तिचित्र : सिकाला वेध लावणारे या बखरीतील व्यक्तिचित्र म्हणजे भाऊ - वाहेबांचे, भाऊसाहेबांची महत्त्वाकांक्षा, निश्चयीपणा, स्वाभिमान, तडफ, ; शौर्य त्यांचे कारभार कौशल्य आणि व्यवहार चातुर्य या गुणांचे चित्रण र मोठ्या आत्मीयतेने करसो. वेगवेगळे प्रकाशकिरण त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तमत्त्वावर पडतात आणि त्यांचे तेजस्वी दर्शन आपल्याला भरावन टाकते. महादजीपंत पुरंदरे याच्या शब्दांतून चिमाजी अप्पांच्या था पूश्राचे शौर्य व निश्चयीपणा हे गुण नेमके टिपले जातात. ' कैलासवासी चिमाजी अप्पा यांणी पूर्वी बहुत पराक्रम केला. त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब हे लढाईत मागे हटणार नाहींत. शत्रूस पराभवितील किंवा आपण कैलासवाली होतील. (१.२) नानासाहेब जाणतात 'रूमशाम येथे स्वराज्य कर हीच उमेद, हाच निजध्यास.' भाऊसाहेबांचा तर इराणीचा वकील म्हणता