पान:पाणिपतची बखर.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५) रसाविष्कार, व्यक्तिचित्रण, वर्णनकौशल्य, निवेदनकौशल्य आणि शैली या साहित्यगुणानीं विनटलेली ही पाणिपतची बखर आटोपशीर, लहान असूनहि। कलात्मकतेने चटका लावते. दि. 1 ।। बखरीत वीर आणि करुण या रसांचा अविष्कार उत्कटतेने होतो युद्धाचे वर्णन, सैनिक एकमेकांवर तुटून पडले त्याचे वर्णन वखरकार करतो, ' लढाईची हातघाई जाहाली, भाला व विचवे व गुरगुजे व जमदाडा व वाघनखे यांचे चपेटे फार जाहाले...... सुक्रोध होऊन अवसाने धरून एकमेकावर पर्जन्यप्राय कोसळू लागले. मल्लयुद्धाचे मारणेच विकडोचे परस्पर दाखवू लागले. ‘बीभत्साची छटाहि या वर्णनांत नंतर मिसळते. ‘कितीकांची शरीरे त्या गर्दीच्या खंदळीत चिरडून गेली. कितीकांचे हातपाय तुटून नुसते कोथळे रणांत राहिले.' (पृ. २१-२२ ); वीररसाच्या प्रकर्षाला ' लढाईची शर्त ’ ‘मोठी झोटधरणी ',' संग्राम महाधुरंधर ' हे शब्दप्रयोग जसे कारणीभूत होतात तसेच ' वतोदके' भूलिगास अभिषेक जाहाला आणि शिरकमले हीच भूलिंगास कमले अर्पण जाहाली.' यासारखे रूपकहीं तो परिणाम साधते. अखेरच्या लढाईचे वर्णनहि असेच प्रभावी आहे. ‘वीरांच्या नजरा फिरोन गेल्या. आपपर कोणी ओळखेनासे जहाले. वीर रणामध्ये माजले. रणमद चढला. कोणास क्षते वर्मी लागलीं... कोणी रणांगणी मूच्छित पडले व कोणाची शिरे तुटोन धडावेगळी जाहाली व कोणाची उदरे फुट्रोन अंतरमाळा लोंब लागल्या.' या बीभत्सावर ‘परंतु अणुमात्र कोणी लढाईविषयी कसर केली नाही.' (पृ. ३८ ) या वीर वर्णनाची मात होते. भाऊंच्या ‘ अभिनव यशाचे' वर्णन करतांना तर बखरकाराला धन्यतेच्या भावनेने भारलेले आहे. यामार्ग या कलियुग असा योद्धा कोणी जाहाला नाहीं पुढेहि होणे जरूर ' शत्रू पराभवाते पावून भाऊसाहेब व विश्वासरावसाहेब उभयता आपआपल्या अंबारीत बसून महागर्जना करून रणतुरे व नौबती आणखी जयवाद्ये वाजवत आपले गोटात चालिले एकच सिंहनाद जाहाला. ( पू. ३९-४०)