(२४) देतो. वखरीतील पानिपतच्या निकाली संग्रामाची तिथी चुकलेली आहे. ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारें ही तिथी पौष शुद्ध अष्टमी ठरते तर बखरीत पौष शुद्ध २ हा उल्लेख येतो. नानासाहेबांना ही पानिपत संग्रा - माची व त्यांत भाऊसाहेब, विश्वासराव पडल्याची बातमी पुण्यास बारनिसाने कळविली व त्यानंतर नानासाहेब पुण्याहून मोहिमेस निघाले ही माहिती चुकीची आहे. नानासाहेव यापूर्वीच पुण्याहून निघाले होत. (२२ नोव्हेंबर १७६०) वखरीच्या प्रारंभीं शाहूच्या अंतसमयीं नानासाहेबां बरोबर भाऊसाहेब होते हा निर्देश गैरसमजाने आलेला आहे. ऐतिहासिक घटनांचा स्थल, काल आणि व्यक्तीविषयक काटेकोर तपशील रघुनाथ यादवाने विचारात घेतलेला दिसत नाही. पानिपत संग्रामाचा ढोबळ, स्थूल आराखडा त्याच्यापुढे आहे. पानिपत संग्रामांतील या बारीकसारीक तपशीलापेक्षां रवृनाथ यादवाला महत्त्वाचे वाटते, ते म्हणजे मराठ्यांचे वीरश्री वैभव आणि भाऊंचा कृतनिश्चय, त्यांनी घेतलेले सृतीचे वाण बखरकाराच्या या भूमिकेमुळे साहजिकच वखत ऐतिहासिकतेपेक्षां वलात्मकतेची वीण अधिक उठावदार झाली असल्यास त्यात आश्चर्य नाही. पाणिपतच्या बखरीची कलात्मकता बखरींत एतिहासिकतेपेक्षां कलात्मकता कशी वरचढ होते याचे ही बखर उत्तम उदाहरण आहे मराठ्यांची महत्त्वाकांक्षा आणि शौर्य यांच्या वर्णनात बखरकाराच्या लेखणीला तेज चढले आहे. पानिपतचा संग्राम हा मराठ्यांच्या इतिहासातील एकीकडे अभिमानाचा-शौर्य गाजविले म्हणून तर दुसरीकडे दु:खाचा अपयश आले म्हणून -असा प्रसंग याबद्दल अर्थातच बखरकाराची संमिश्र भावना आहे आणि ती त्याने वखरीत तळमळीने व्यक्त केली आहे. या तळमळी मुळे, जिव्हाळ्यामुळे प्रसंगवर्णनांत रसाविष्कार साधला आहे. यथातथ्य उठावदार वर्णने आणि प्रसंगाची उत्कंठावर्धक मांडणी हे कलागुणही बखरीत आहेत. येथील भाऊसाहेबांचे तेजस्वी व्यक्तिचित्र म्हणजे बखरीचे भूपण आहे. इतर व्यक्तींची रेखाचित्रेहि मनोरम आहेत. वैखरीतील प्रसंग आणि व्यक्ती यांचे चित्रण रघुनाथ यादवाच्या डौलदार प्रवाही भाषेमुळे अधिकच आकर्षक वठले आहे.
पान:पाणिपतची बखर.pdf/32
Appearance