Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| (२३ ) साधनांच्या आधारे सत्य ठरसे. इराणीतर्फे वकिली होते तेव्हा ' नर्मद दक्षिणतीरापासून पलीकडील हद्द तुम्ही आपली संरक्षण करून असावे ( पृ. १७ ) म्हणून सांगितले जाते तर भाऊसाहेबांकडून तुम्ही आल्या मार्गे अटक उतरून जावें, भाईचारा राखावयाचा असल्यास लौकर फौजेसुद्धा माघरों जावे' असे कळविले जाते. तहाचा प्रयत्न फसल्यावर दोन्ही सैन्यांच्या दोन तीन लढाया झाल्या. प्रथम मराठ्यांची वाजू वरचढ होती. पण पुढे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले. अब्दालीने याचा बरोबर फायदा घेतला. रघुनाथ यादव लिहितो, ‘ मग महर्गतेची वार्ता त्यांनी श्रवण करून सलूखाची वात व युद्धाची तयारी करणे ही गोष्ट अगदीच टाकिली. चलविचल न करितां थंड राहिले ' (पृ. २८) पुढे सरदारही भाऊसाहेबांजवळ म्हणतात, ‘ तुमच्या लष्करची खराबी इराणीस कळली. आतां सर्वस्वी वुडवितो' (पृ. ३०) आपल्यापेक्षां जोरदार असणारे मराठे उपासमारीने अर्धमेले होऊन जाईपर्यंत त्यांच्याशी युद्ध करावयाचे नाहीं हा फेबियन डावपेच अबदालीने उपयोजिला. असे राजवाडे म्हणतात. (ऐ. प्र. पृ. ८८ ) त्याचेच नेमके प्रत्यंतर बखरीतील या वाक्यांतून येते. पानिपत संग्रामात्रे प्रत्यक्ष वर्णन करतांना रघुनाथ यादवाने कल्पनेला अधिक अवसर दिला आहे हे मान्यच केले पाहिजे. तरीहि या संग्रामांत विश्वासराव व भाऊसाहेव यांचा झालेला अंत, मराठ्यांनी गाजविलेली वीरश्री, संग्रामानंतरची दुरवस्था, नानासाहेबांना बस ला तीव्र धक्का या घटना सत्य, वास्तव आहेत; त्यावरच कल्पनेची कलाकू सर रघुनाथ यादवाने केली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. इतिहासकाराच्या काटेकोर दृष्टीने पाहिले तर पाणिपतच्या बखरीतील निवेदनांत रघुनाथ यादवाने कांहीं चुका केलेल्या आढळतात. कांहों नांवें चुकलों आहेत. काहीं कालनिर्देश चुकले आहेत. नजीब वान रोहिल्या. बद्दल बखरीत मनसूर अली हे नांव आणि अबदालीचा पुत्र तैमूरशहा याबद्दल तेजूरशहा हे नांव ले आहे. गोविंदपंत बुंदेल्यावर अवदालीने अताईवान व करीमदादखान या सरदारांना पाठविल्याचे इतिहासांत नमूद आहे. त्याऐवजी बखरकार शास्ते वां व जुरुपुकरां या सरदारांची नावे