* (२२) | मोगल बादशाहीच्या रक्षणासाठी उत्तर हिंदुस्थानांतील सर्व सरदार, संस्थानिकांनी एकत्र यावे आणि अबदालीला घालवून द्यावे ही भाऊसाहेबांची भूमिका होती. ' अवदालीची नड हिंदुस्थानचे पातशाहींत रुजों देणे हें अयोग्य ' हे त्यांचे वाक्य प्रसिद्धच आहे. ( राजवाडे खंड १, क्र. १६७ ) यासाठीच त्यांनी सृजाउद्दौलाला वळवण्याचा आणि सुरजमल जाटाला राखण्गाचा प्रयत्न केला हे इतिहासात नमूद आहे. जाट अविश्वासू ही कल्पना आली असताही भाऊसाहेबांनी ' तुम्ही बादशाहीचे दुवागीर, इमानी आहां. आमचा वसवसा काडीमात्र न धरतां सर्व जमातीनिशी एकदील होणे ' असा सल्ला त्याला दिला आहे आणि सुजाउद्दौलाला * इराणीस आंग दिल्हे' म्हणून दोष दिल्यावरही ‘ तुम्ही व आम्ही एकत्र होऊन ( इराणी ) अगदी नेस्तनाबूद करावा' असे म्हटले आहे. बखरकाराने सुजाउद्दौला व जाट यांच्या बाबतचे भाऊसाहेबांचे वर्तन व सल्लामसलत यांचे जे वर्णन केले आहे, ते इतिहास संशोधनाच्या प्रकाशत पाहतां योग्यच ठरते. इतकेच काय ‘जाट अविश्वासू ' हे जे बखरीतील भाऊंचे म्हणणें आतांपर्यंत अतिशयोक्त वा निराधार वाटत होते, तेहि आता भाऊसाहेबांच्याच एका नवोन उपलब्ध झालेल्या पत्रानुसार सत्य स्थिती सांगणारेच ठरते. ( जाटांचा जमीदारी कावा सांगणारे ' नाना फडणीस यांचे शब्दांत पानिपतचा रणसंग्राम' या पुस्तकांतील पत्र क्रमांक २७ पहा पृ. ५९-६४ ) रघुनाथ यादवाने रजपुतांच्या बाबतचे केलेले निवेदन योग्य आहे. रजपूत ...दोहींकडे अंग न देता सल ख राख नवस्य राहिले हे वाक्य रजपुतांची तटस्थता, इराणी किंवा मराठे दोघांनाहि न मिळतां पारडे कोणाकडे झुकते हैं पाहण्याची त्यांची धूर्तता या ऐतिहासिक वस्तस्थितीवर प्रकाश टाकते. उत्तर हिंदुस्थानांतील ही मराठयांना, भाऊसाहेबांना जाचक असणारी परिस्थिती, कोणाचे हि त्यांना साहच न मिळाल्याने एकाकीपणे त्यांना द्यावा लागलेला लढा याची क7ना रघ नाथ यादवाच्या निवेदनावरून येते. पानिपतचा निकाली संयम होण्यापूर्वी तहाचा झालेला प्रयत्न आणि इराणीने मराठ्यांची उपासमार व दैन्य पाहून थंड राहण्याचा योजलेला यद्धांतील डावपेच यांची माहिती बखरीत आली आहे, ती ऐतिहासिक
पान:पाणिपतची बखर.pdf/30
Appearance