Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१) मिळालेला विजय या पाश्र्वभूमीवर केली आहे. रघुनाथ यादवाने या ठिकाणीं महादजीपंत पुरंद-याने पेशव्यांना दिलेला सल्ला उद्धृत केला आहे. हे उद्गार कदाचित ऐतिहासिकदृष्ट्या असत्यही असतील, म्हणजे यांना अस्सल ऐतिहासिक आधार नसेल परंतु त्यांत जो आशय व्यक्त झाला आहे त्यांत भाऊंच्या स्वभावाचे आणि गुणांचे जे मर्म ग्रथित झाले आहे ते सत्यच आहे. भाऊसाहेबांच्या कारभारांतील कौशल्य अणि त्यांचा स्वाभिमानी दृढ निश्चयी व आग्नही स्वभाव यांचे नेमके वर्णन या उद्गारांत आले आहे. नानासाहेबांनी भाऊंचा ' मागील पराक्रम मनांत आणून पुढेही रूपज्ञाम येथे स्वराज्य करणे होच उभेद' हा निजध्यास जाणून त्यानाच पाठविण्याचा निश्चय पक्का केला असे बखरकाराने म्हटले आहे. ' इराणी अटकनदी उतरून अलीकडे आला, त्यास अटकेपार घालवावा या कारणास्तव ही मोहीम होती. तेव्हां प्रबल शत्रूशी सामना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी, पराक्रमी आणि कारभारकुशल भाऊसाहेबांची योजना झाली हे बखरकाराचे निवेदन यथोचित होय. भाऊसाहेबांची या मोहिमेबाबतची जी ठाम आणि दृढ़ भूमिका होती ती बखरकाराने त्यांच्या उदगारांतून स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत मांडली आहे. आज भाऊसाहेबांची गोविंदपंत बुंदेले यांनी लिहिलेली जी पत्रे उपलब्ध झाली आहेत, त्यांतील मजकूर आणि बखरकाराने मांडलेली विचारसरणी यांत कमालीचे साम्य आहे. भाऊसाहेब जाटाला सांगतात, * बादशाही कायम करावी आणि शत्रूचा पराभव करावा (पृ. ७) आम्ही फरजंद, ... जेणे करून बादशाही सलामत राहील तेच करावयास आलो आहो' (पृ. ८ ) इराणीच्या वकिलांना ते निर्भयपणे प्रत्युत्तर देतात, * हिदुपत बादशाही येथील बंदोबस्त करणे, तो आम्हीच करू ' (पृ. १७) या वाक्याशीं पत्रांतील पुढील वाक्यांचे केवढे साधर्म्य आहे ! आम्हांस तर चकतेयाची बादशाही राखणे यासाठी अबदालीशी सलूख करणें नाहीं. ( राजवाडे खंड १, पृ. १७३ ) ‘ तैमूरियाची पातशाही, याचा बंदोबत कळेल तसा आम्ही राजश्री पंतप्रधान यांच्या इत फाकाने करू. तुम्ही या गोष्टींत न पडावे' ( राजवाडे खंड १, क्र. १७९)