Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०) पृ. ४३७ टीप ) रघुनाथ यादवाने दफात्यांचा आधार घेतला म्हणून व पानिपत संग्रामानंतर २ वर्षांनी लिहिली म्हणून सरदेसाई पानिपतची बखर विशेष ग्राह्य म्हणतात तर दफात्यांचा उपयोग नीट केला नाही म्हणून राजवाडे रघुनाथ यादवाला दोष देतात. राजवाडे म्हणतात, ‘ रघुनाथ यादवकृत पानिपतची बखर मोठ्या कसोशीनें पारखून घेतली पाहिजे. रघुनाथ यादवाने दफात्यांचा नीट उपयोग केला नाही असे म्हणावे लागत. माहितीपेक्षां वर्णनाने ही बखर जास्त फुलविलेली आहे.' ( ऐ. प्र. पृ. १०८ ) रघुनाथ यादवाचे लक्ष ऐतिहासिकतेपेक्षां कलात्मकतेकडे अधिक प्रमाणांत वळले आहे असा याचा उघड अर्थ आहे. यामुळेच इतिहास संशोधक प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर आणि सर यदुनाथ सरकार या बखरीवर ताशर उ: वितांना दिसतात. प्रा. शेजवलकर म्हणतात. • Though ostensibly written by a courtclerk and that by order of a member of Peshwa's family this is the most worthless all Panipat Bakhars' (Panipat 1761, p. 136) | सर यदुनाथ सरकार तर ही अफूबाजीची गोष्ट opium eater's tale समजतात ( Fall of the Mughal Empire vol. II p. 367 ) बखरीवर असे ताशेरे झाडणे थोडेसे अतिरेकाचेच ठरेल. त्यापेक्ष इतर अस्सल साधनांनीं ग्राह्य ठरणारा बखरींतील भाग सत्य मानावः आणि बखरकार समकालीन असल्याने त्याची पानिपतसंग्रामाबाबतचीं एकंदर भूमिका लक्षणीय म्हणून विचारात घ्यावी हे धोरण ठेवणेच अधिक हितकारक ठरेल. पानिपतच्या मोहिमेसाठी भाऊसाहेब व विश्वासराव यांची रवानगी नानासाहेब पेशव्याने केली या घटनेच्या निवेदनाने बखरीला प्रारंभ होतो. भाऊसाहेबांची निवड पेशव्याने राघोबादादाला पाठविण्याचा पूर्वीचा विचार बाजूला सारून केली याची मीमांसा इतिहासकारांनीं राघोबादादाचा नाकर्तेपणा आणि भाऊसाहेबांचा खंबीरपणा, उदगीरच्या लढाईत त्याला