पान:पाणिपतची बखर.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

S-- (१९) विलेले धैर्य, सैन्यांत निर्माण केलेला जोष आणि अखेर पानिपतच्या यद्धांत विश्वासराव व भाऊसाहेब यांची पडलेली आहुती, या बातमीने नानासाहेब पेशवे यांना झालेले दु:ख व त्यानेच त्यांचा ओढवलेला अंत यांचीहि माहिती बखरकार देतो. पानिपतचा संग्राम प्रत्यक्ष घडण्यापूर्वी भाऊंनी केलेले राजकारण, त्यांची " बादशाही कायम करावी आणि शत्रूचा पराभव करावा' ही असलेली ठाम भूमिका, मराठे व अबदाली दोन्ही बाजूनी तहाचा झालेला प्रयत्न, त्यांत सलोखा न साधल्यावर लढाई करावी हाच झालेला निश्चय या महत्त्वाच्या भागावरहि रघुनाथ यादवाने लक्ष दिले आहे. याप्रमाणे पानिपतच्या संग्रामाची पाश्र्वभूमी, प्रत्यक्ष संग्रामांतील रणधुमाळी व ओढ-- वलेला नाश यांचे निवेदन ' पाणिपतच्या बखरीत आले आहे या वृत्तांतनिवेदनांत ऐतिहासिकता आणि कलात्मकता हे दोव पदर एकमेकांत गुंफले गेले आहेत. या बखरीची ऐतिहासिकता प्रथम जोखून नंतर तिच्यांतील कलात्मकतेचा परामर्श धेऊ. पाणिपतच्या बखरीची ऐतिहासिकता पानिपतच्या संग्रामाचे वर्णन करणारी ही बखर असल्यामुळे साहजिकच तिच्याकडे इतिहाससंशोधकांचे लक्ष वेधले आणि इतिहाससाधन म्हणून त्यांनी तिचे मूल्यमापन केले. इतिहाससंशोधकांच्या या बखरीबाबतच्या विधानांत फार मोठी तफावत आढळते. यखरलेखक रखनाथ यादव याने आपण बखरीसाठीं चिटणीसांच्या दफात्यांचा आधार घेतला आहे हे जसे नमूद केले आहे, तसेच ‘ यथा मतीनें बखर सजवून सेवेंशी पठविली आहे.' असे पुढे म्हटले आहे. म्हणजेच बखरीच्या ऐतिहासिकता व कलात्मकता या दोन पदरीं विणीची जाणीव बखरकाराला स्पष्टपणे आहे. उलट बखरीचे हे संमिश्र स्वरूप न कळल्यामुळे इतिहाससंशोधक मात्र दोन टोकांची मते प्रदर्शित करतांना आढळतात. रियासतकार गो. स. सरदेसाई पानिपतची बखर अव्वल साधनावरून लिहिली गेली म्हणून अव्वल दर्जाची मावतात, ( म. रि. पे. बा.