Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८) सान्यांच्या प्रतीची भाषा निश्चितच अधिक डौलदार, भारदस्त अशी आहे. तसेच काव्येतिहाससंग्रहात प्रसिद्ध झालेली प्रत रघुनाथ यादवाने गोपिकाबाईसाठी लिहिलेली आहे, हेही लक्षणीय आहे. पेशवे घराण्याशी रघुनाथ यादवाचे संबंध निकटचे असणे हे अधिक स्वाभाविक ठरते. यामुळे के. साने यांनी प्रसिद्ध केलेली प्रतच अधिक विश्वसनीय मानावी लागते. शिवाय काव्येतिहाससंग्रहांतील प्रतीत दकात्यांची संगत पाहून बखरीतील हकीगत लिहिलो असा निर्देश येतो तसा मराठवाडा प्रतीत नाही हेहि लक्षणीव आहे. दोन्ही प्रतींची मजकर, भाषा यादृष्टीने पाहणी करतां के. सान्यांनीं काव्येतिहासस ग्रहांत प्रसिद्ध केलेली रघुनाथ यादव विरचित पाणिपतची बखरच मुळांत अधिक जवळची असावी असे मानणे योग्य होईल. ( कै. रा. ब. का. ना. साने यांनी इ. स. १९१४ साली प्रसिद्ध केलेली या बखरीची चौथी आवृत्ती आधारभूत मानून प्रस्तुत प्रकाशनाची प्रत प्रसिद्ध केली आहे. ) पाणिपतच्या बखरीचा विषय मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा प्रसंग पानिपतचा संग्राम हा या बखरीचा विषय आहे. रघुनाथ यादवाने भाऊसाहेबांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी झाली येथपासूम प्रारंभ केला आहे आणि पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांनी शौर्य गाजविले, परंतु त्यांच्या वांटयाला अखेरीस अपयश आले या दुर्दैवी घटनेचे वर्णन बखरीच्या अखेरीस केले आहे: भाऊसाहेबांचा सुजाउद्दौला व सुरजमल जाट यांना वळवण्याचा प्रयत्न दिल्ली व कुंजपुरा हस्तगत करणे, अबदाली व मराठे यांच्यांत झालेल्या लढाया व दुतर्फ झालेला नाश, मराठ्यांची झालेली उपासमार व लढून मरण्याचा त्यांनी केलेला निश्चय, अखेरच्या संग्रामांत मराठ्यांनी वीरश्रीची केलेली शर्थ आणि त्यांचा झालेला सर्वस्वनाश, या विविध घटनांचे वर्णन बखरीत आले आहे. दुष्काळाच्या संकटाने गाजलेल्या सरदारांनीं। भाऊसाहेबांवर ठेवलेला दोषारोप, भाऊसाहेबांनीं संकटसमयांतहि टिक