(१७) प्रतीत ‘ नाना फडणीसाचे नांव नाहीं." हे तिचे वैशिष्ट्य म्हणून संपादकांनी सांगितले आहे आणि के. सान्यांच्या प्रतींत भाऊसाहेबांनी युद्धाच्या आदल्या दिवशी ज्या मंडळींशीं सल्लामसलत केली त्यांतील नाना फडणी - साचा उल्लेख हा ' नानाला पुढे जे राजकीय महत्व प्राप्त झाले ते विचारात घेऊन वाढवलेला आहे ( प्रस्तावना पृ. ७ ) असे मतप्रदर्शन केले आहे. परंतु नाना फडणीसाचे आत्मचरित्र ब भाऊसाहेबांची बखर यांतील उल्लेखांवरून भाऊसाहेब व नाना यांचे निकटचे संबंध प्रस्थापित होतात. दोन्ही बखरींचा शेवटही वेगवेगळा आहे. १४ जानेवारी १७६१ रोजी म्हणजे युद्धाच्या दिवशी प्रात:काळी विश्वासराव व भाऊसाहेब स्नानसंध्या व आन्हिक करून सालंकृत आणि सायुध महान राष्ट्रीय कार्ययन करण्याकरतां निधाले या वर्णनाने मराठवाडा प्रत संपते. उलट कै. सान्यांच्या प्रतीत यानंतरचा विश्वासराव व भाऊसाहेब यांचा हृदयद्रावक अत, नानासाहेबांचा शोक व त्यांचे देहावसान ही सर्व माहिती येते. मराठवाडा प्रतींत ‘ आज्ञाप्रमाने तयार जाहले समाप्त ' अशी अक्षरे आहेत. म्हणूनच केवळ ती बखर संपली असे म्हणावे लागले; पण पानिपतच्या हकिगतीच्या दृष्टीने पाहतां खरोखर पुढील महत्त्वाचा संग्राम वृत्तांत त्यांतून गळला असे दिसते. संपादकांनींहि | अशा त-हेचा शेवट केल्यामुळे ब वरीला एक प्रकारची अनैतिहासिकता प्राप्त झाली असल्याचे मान्य केले आहे. केवळ ऐतिहासिकतेच्या दृष्टीनेच नव्हे तर कलात्मकतेच्या दृष्टीने हि हा शेवट अयोग्य वाटतो. निकाली संग्रामाचा महत्वाचा भागच निवेदनांतून डावलला गेला. तेव्हां या शेवटामुळे वखरीला भावना मनोहर अशी काव्यमय कमनीयता' आली आहे हे संपादकाचे म्हणणे पटत नाहीं. बखरीचा प्रारंभ आणि शेवट या दृष्टीने पाहतां कलात्मक संगती के. सान्यांच्या प्रतीतच अधिक प्रमाणांत आहे. भाऊसाहेबांची व विश्वासरावांची मोहीमेवर रवानगी हा प्रारंभ आणि संग्रामांत भाऊसाहेबांची व विश्वासरावांची पडलेली आहुती, मराठ्यांचा झालेला सर्वस्वनाश आणि नानासाहेबांचा शोकाने झालेला अंत, हा बखरीचा शेवट यांत निवेदनाचा परमोत्कर्ष स्वाभाविक रीतीनें गांठलेला आहे. मराठवाडा प्रतीच्या भाषेपेक्षां कै.
पान:पाणिपतची बखर.pdf/25
Appearance