पान:पाणिपतची बखर.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६) प्रत. हिच्या प्रथम पृष्ठांवर श्रीकाराच्या डाव्या कोप-यावर ' सखाराम मोरेश्वर वझे दस्तुर खुद्द ' असे नांव आहे. हिचे साठ-पासष्ट वंद असावे, पैकीं साडेअठ्ठेचाळीस बंद आम्हांस मिळाले. ही प्रत करणारास मूळ प्रतीचे अक्षर पुष्कळ ठिकाणीं लागले नाही, असे दिसते. हिच खर्ची बंद उभे दोन फूट लांब व चार इंच रुंद असे आहेत. अक्षर बरे आहे. ही बंदाच्या एका बाजूने लिहिलेली आहे, हिचे शेवटले बंद नसल्यामुळे ही कोणी कधीं व कोठल्या प्रतीवरून लिहिली हे कळण्यास मार्ग नाहीं. हिच। व वरील नागपूर प्रतीचा बराच मेळ पडतो. पाणिपतच्या बखरीची एक नवी आवृत्ती । मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे इ. स. १९५५ साली रघुनाथ यादव चित्रे यांच्या पानिपतच्या बखरीची एक नवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. रघुनाथ मुरलीघर जोशी यांनी ती संपादित केली आहे. बखरीच्या प्रारंभ * श्रीमंत महाराज दौलतराव घोरपडे मलकत मदार' यांचे ठिी ‘ रघुनाथराव चित्रगुप्त ' याने ही बखर लिहिली, असा उल्ले व आहे. हे घोरपडे व ऐतिहासिक पत्रव्यवहारमधील क्र. २५५ चे पत्र नाना फडणीसांना लिहिणारे घोरपडे एकच असावे, असे संपादक म्हणतात. तसेच ते पानिपतच्या युद्धांत समक्ष उपस्थित होते, असे त्यांनी म्हटले आहे. संपादकांना उपलब्ध झालेली प्रत ‘दौलतराव हिंदुराव घोरपडे यांच्यासाठी लिहिलेली आणि कुकनूर येथील कोनेर गौडा यांच्या प्रेरणेने काही महत्त्वाचे फरक करून लिहिलेली दिसते. के. रा. ब. का. ना. साने यांनी काव्येतिहाससंग्रहांत प्रसिद्ध केलेल्या बखरीशीं या बखरीचे बरेच साम्य आढळते. बराच मजकूर व पुष्कळ वाक्ये दोन्ही बखरींत सारखी आढळतात. परंतु कांहीं बाबतीत फरकही पाहावयास मिळतो. या बखरीच्या सुरुवातीला निजाम व मराठे यांची बरीच माहिती येते. " मुजफरजंगाच्या प्रेरणेने हैदरजंगाने भाऊसाहेबांवर हल्ला केला' असा उल्लेख त्यांत आहे. के. सान्यांनी प्रसिद्ध केलेल्या बखरींत भाऊसाहेबांची मोहिमेवर रवानगी झाली, येथपासून माहिती येते. मराठवाडा