(१५) | (२) दुसरी प्रत भिवंडी येथील एका गृहस्थाने आम्हांकडे पाठविली. ही जुन्नरी कागदाच्या चौरस बंदांवर दोन्ही बाजूंनी बुकासारखी वही बांधून त्याजवर लिहिली आहे. हिच्या पहिल्या वंदाचे डावे अर्ध गेले असल्यामुळे व उजवे जीर्ण झाल्यामुळे पहिली दोन पृष्ठे नाहीत, असेच म्हणावयाचे. दोन पृष्ठांचा एक बंद, याप्रमाणे एकेचाळीसाव्या बंदावर म्हणजे ८१ व्या पृष्ठांवर ही बखर समाप्त झाली आहे. ह्या प्रतीचे अक्षर वाटोळे, दळणदार व सुवाच्य लिहिलेले आहे. पृष्ठांची लांबी-रुंदी फूटफूट असून प्रत्येक पृष्ठावर अकरा ओळी लिहिलेल्या आहेत. वही सुटून बंद निरनिराळे व बरेच जीर्ण झालेले आहेत, तरी अक्षरे शाबूत आहेत. ‘ कृष्णाजी त्रिक जोगळेकर' असे नांव प्रथम पृष्ठांच्या जीर्णलेल्या उजव्या अविर दोनदां घातलेले आहे. शेवटीं । ही किताबत महंमद इF Tइम वल्लद बापूसाहेब कबे सुभेदार वस्ती कसवे ठाणे तारीख १२ माहे में सन १८२४ तारीख १२ माहे रमजान शरीफ सन १२३९ हिजरी शके १७४६ ता रणनाम संवत्सरे, वैशाल्ल वद्य १ प्रतिपदा बुधवार दिवसाचे अकरा दरावर समाप्त केली. हस्ताक्षर गोपाळराव बल्लाळ गद्रे वसईकर हल्लीं वस्ती कसबे ठाणे' असा लेख आहे. यावरून ही प्रत लिहून साठ वर्षे होऊन गेली व मूळ मालकापासून ती जोगळेकर यांजकडे मागाहून आली, असे होते. (३) तिसरी प्रत रा. रा. वामनराव दाजी ओक यांनी नागपूरहून बाळबोध प्रत करून पाठविलीं ती. तिच्यावर मूळ बखरीचा शक १६८३ वृषानाम संवत्सर असा दिला आहे. मित्ती फाल्गुन शुद्ध आहे. यावरून तर युद्ध झाल्यावर १ वर्ष २ महिन्यांनीच ही रचिली असे होते. ही नकलेची नकल श्रावण शुद्ध ५ पंचमी शके ११५४ (?) आनंदनाम संवत्सरे मुक्काम पुणे येथे केली, असे शेवटी लिहिले आहे, यावरून प्रत कधीं केली हयाचा निर्णय होत नाही. नकल करणारा श्रीधर गणेश परांजपे, ह्या नागपूर प्रतींत व वरील पुणे आणि ठाणे प्रतीत मजकूर जरी शेवटपर्यंत एकच आहे, तथापि नागपूर प्रतीत पुष्कळ ठिकाणीं शब्द व वाक्ये जास्त आढळतात. (४) पुणे येथे बाजारात आम्ही एक प्रत विकत घेतली ती चौथी।
पान:पाणिपतची बखर.pdf/23
Appearance