(१४) माहिती अधिक मिळाली नाहीं, ( पा. ब. उपोद्घात, पृ. ५, का. ना. साने आवृत्ती ४ थी ) पाणिपतच्या बखरीचा लेखनकाल रघुनाथ यादवाने बखरीला प्रारंभ ‘ छ, २५ जमा दिलाखर' म्हणजे १० जानेवारी इ. स. १७६३ ला केला. बखरीचा शेवट • शके १६८४ चित्रभानुनाम संवत्सरे माहे फाल्गुन शुद्ध ५ मंदवासर' म्हणजे १८ फेब्रुवारीस झाला. या दिवशीं मंदवासर (शनिवार) नव्हता शुक्रवार होता असे राजवाड्यांचे म्हणणे आहे ( ऐ. ए. पृ. १०८ ) पानिपतच्या युद्धानंतर (१७६१) बरोबर दोन वर्षांनी ( १७६३ ) ही बखर लिहिली गेली. यामुळे समकालीन बखर या दृष्टीने या बखरीचे महत्त्व विशेष मानले पाहिजे. रियासतकार सरदेसाई यांनी पानिपतची बखर विशेष ग्राह्य मानली आहे. ( म. रि. मध्य विभाग ३, पृ. १३३ ) ‘पानिपतच्य मुद्धांत रघुनाथ यादव हजर होता' या सरदेसाईंच्या विधानाला ( म. रि. १. बा. पृ. ४३७ ) मात्र निश्चित आधार उपलब्ध नाही. तो माहितगार होता एवढे मान्य करता येईल. दफात्यांचा आधार रघुनाथ यादवाने बखरीच्या अखेरीस नमूद केला आहे. पाणिपतच्या बखरीच्या प्रती काव्येतिहास संग्रहांत के. रा. ब. का. ना. साने यांनी प्रथम इ. स. १८८५ मध्ये ही बखर प्रउिद्ध केली. साने यांना एकूण चार प्रती उपलब्ध झाल्या. १) पुणे प्रत १, २) भिवंडी प्रत, ३) नागपूर प्रत, ४) पुणे प्रत २. कै. सान्यांनी पुणे प्रत १ व भिवंडी प्रत याचा मेळ बसत असल्याने त्यावरूनच बखर प्रसिद्ध केली. के. साने यांनी या प्रति संबंधी दिलेली माहिती खालीलप्रमाणे आहे. (१) या बखरीची पहिली प्रत पुणे येथील राजश्री शंकर तुकाराम शाळिग्राम यांच्या मार्फत मिळाली. ही खर्ची उभ्या बंदांवर लिहिलेली आहे. अक्षर चांगले आहे.
पान:पाणिपतची बखर.pdf/22
Appearance