(१३) जाहली. त्यास यथामतीने निवेदन करितो.' रघुनाथ यादव आपण चिटणीसाकडील कारकून असल्याचे सांगतो. या उल्लेखामुळे शिवाजीमहाराजांची बखर लिहिणारा रघुनाथ यादव चित्रे ऊर्फ चित्रगुप्त आणि हा रघुनाथ यादव एकच होय, असे प्रतिपादन प्रा. र. वि. हेरवाडकर यांनी केले आहे. ( पा. ब. प्रस्तावना, पृ. १७ ) शिवाजी महाराजांची बखर लिहिणा-या रघुनाथ यादव चित्रे यांचे वर्णन राजवाड्यांच्या ४ थ्या खंडाच्या प्रस्तावनेत आले आहे. ( ऐ. प्र. पृ. २१ ६ ) बाळाजी आवजी चिटणीस हा रघुनाथ यादवाचा चुलत आजा. बाळाजीस चिमणाजी व शामजी हे दोन भाऊ होते. ह्या दोघांपैकी कोणा एकाचा वंशज रघुनाथ यादव असावा. पौराणिक थाटावर त्याने आपले नांव चित्रगुप्त लावले आहे. कोल्हापूर दरबारी तो चिटणीशी करी. राजारामपुत्र संभाजी याच्या दरवारों वयाच्या बाराव्या वर्षापासून पुढे ४० वर्षे रघुनाथ यादवाने चिटणीशी केली. संभाजीच्या मृत्यूनंतर त्याला यशवंतराव शिंद्यांचा आश्रय मिळाला. रघुनाथ यादव माहितगार मनुष्य असल्याचे राजवाडे सांगतात. येथे फक्त चित्रगुप्ती बखरीचाच उल्लेख आहे. पाणिर्पतची बखर या रघुनाथ यादवीचीच असती तर तसा निर्देश राजवाड्यांनी ओझरता का होईना येथे केला असता असे वाटते. पाणिपतची बखर लिहिणाच्या रघुनाथ यादवाचा उल्लेख राजवाड्यांच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत दोनदा आला आहे. ( ऐ. प्र. प. ९६ व १०८) एकाच रघनाथ यादवाने शिवाजी महाराजांची बखर व पाणिपतची बखर या दोन्ही बजरी लिहिल्या असत्या तर खंड १ प्रस्तावना किंवा खंड ४ प्रस्तावना कुठेतरी या गोष्टीचा उल्लेख केल्यावांचुन राजवाडे राहिले असते असे वाटत नाही. यामुळे आणि तकशिवाय दुसरा कोणताच आधार उपलब्ध नसल्यामुळे पाणिपतच्या बखरीचा कर्ता रघुनाथ यादव व चित्रगुप्त हे आज तरी निःसंदिग्धपणे एकच होत असे म्हणता येत नाही. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे आणि पाणिपतची बखर काव्येतिहाससंग्रहांत प्रथम प्रसिद्ध करणारे रा. ब, का. ना. साने यांनीहि याबाबत संशयच प्रगट केला आहे. ( म. सा. आवृत्ती ५ वी, पृ. ६१३ तळटीप) 'बखर रचणार रघुनाथ यादव यांजविषयी
पान:पाणिपतची बखर.pdf/21
Appearance