पान:पाणिपतची बखर.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) सरदारांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि वकिलांना दिलेल्या प्रत्युत्तरांतून प्रगट होणारा निर्धार यांतून ही गौरवपर भूमिका स्पष्ट दिसते. रघुनाथ यादवाच्या विचारसरणीत दैववादाचा प्रभाव अधिक आहे, यामुळे पानिपतवरील पराभवाचे कारण तो ‘ श्रीहरी विन्मुख जाहला' हे देतो; तर भाऊसाहेबांचा बखरकार भाऊंनीं स्वीकारलेली लढाईची यावनी पद्धती दोषास्पद ठरवितो. विषयाची मांडणी, सजावट, व्यतिचित्रे आणि मीमांसा या बखरीच्या विविध अंगांत याप्रमाणे व्यक्तित्वानुसार फरक पडत असतो, बखरीचे हे वेगळेपण वा वैशिष्ट्य हेच तिच्या कलात्मक समृद्धीचें मूल कारण ठरते. बखरीची वाङमयीन दृष्टीने पाहणी करतांना व्यक्तित्वाविष्काराचा हा पैलू केंद्रीभूत ठरतो. बखरकाराच्या व्यक्तित्वाच्या लोलकांतून बखरीतील घटना, प्रसंग, व्यक्ति यांचे किरण परावर्तत होतात आणि त्यांतून विविधरंगी वाङमयीन सौन्दर्य अवतरते. बखरीचा विषय इतिहासांतील असतो म्हणून तिचा ऐतिहासिकतेचा पदर प्राथमिक मानला तरी विषयाच्या मांडणींत, आविष्कारांत बखरकाराच्या ध्यक्तित्वाचा मोठा भाग असल्यामुळे बखरीच्या सिद्धींत अखेर कलात्मकतेचा पदरच प्रभावी ठरतो. बखरीच्या ऐतिहासिक मूल्यापेक्षां बखरीच्या वाङमयीन मल्याकडेच अधिक कटाक्षाने पाहणे आवश्यक ठरते, ते यामुळेच होय. २. पाणिपतची बखर पाणिपतच्या बखरीचा लेखक पाणिपतच्या बखरीच्या प्रारंभीं गोपिकाबाईच्या आज्ञेवरून रघुनाथ यादवाने ही बखर लिहिली असा उल्लेख येतो. ' श्रीमंत महाराज मातोश्री गोपिकाबाई ..... साहेबांचे सेवेशीं, आज्ञाधारक रघुनाथ यादव लेखक दिमत चिटणीस ..... श्रीमंत यांजकडून, वर्तमान आजपर्यंत झालें तें विदित व्हावे म्हणून आज्ञाधारकास आज्ञा