पान:पाणिपतची बखर.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११) तो एक भाग बनल्यामुळे बखरींतील व्यक्तित्वाविष्कारात त्याचा स्वाभाविकपणे अन्तर्भाव होतो. बखरीला कलात्मक एकजिनसीपणा प्राप्त करून देणारे खरे केंद्र म्हणजे बखरकारांचे हें व्यक्तित्व होय. या दृष्टीने बखरीतील व्यक्तित्वाविष्काराचे आकलन होणे जरूर आहे. बखरींतील व्यक्तित्वाविष्कार बखरीत ऐतिहासिकतेपेक्षां कलात्मकता वरचढ असते, असे मागे म्हटले, असे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बखरीत होणारा व्यक्तित्वाविष्कार हे होय. एकच घटना केंद्रीभूत असलेल्या एकाच प्रसंगाचे वर्णन करणाच्या दोन बखरीत फरक पडतो, याचे कारण त्या बखरकारांना उपलब्ध झालेली माहिती वेगळी असते. यापेक्षाही त्यांची या घटनेकडे या प्रसंगाकडे पाहण्याची दृष्टी भिन्न असते. त्यांत भाग घेणा-या व्यक्तीबद्दलच्या या बखरकरांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. घटना अशी अशी घडली, व्यक्तींचे वर्तन असे असे झाले, या ऐतिहासिकतेबरोबर त्यामागे असलेल्या प्रेरणा कारणपरंपरा, घटनेचे झालेले परिणाम आ ण त्यांत गुंतलेल्या व्यक्तीचे रागद्वेष, सुखदुःखें याकडे स्वत:च्या विशिष्ट दृष्टीने बखरकार पाहतो आणि प्रसंगचित्रण, व्यक्तिचित्रण करतो तेथे अररिहार्यपणें व्यवितत्वाविष्कार होतो. पानिपतसंग्रामावरील ‘भाऊसाहेबांची बखर’ आणि ‘पाणिपतची बखर' या दोन बखरी वरवर चाळल्या तरी बखरकाराच्या व्यक्तित्वाविष्कारामुळे चित्रगांत तफावत कशी पड । हे सहज जाणवते. भाऊसाहेबांच्या ववरीचा लेखक प्रसंगव गं न फुलवतो, व्यवतींच्या भावभावनांना अधिक अवसर देतो. त्या मानाने रघुनाथ यादव संयमाचा वापर अधिक करतो. भाऊसाहेब हे पानिपतच्या संग्रामाचे ना’ क ( सेनापती ). त्यांच्याबद्दल या दोन वखरकारांची दृष्टी भिन्न आहे. भाऊसाहेबांचा घखरकार भाऊंकडे साशंक, दोधक दृष्टीने पाहतो, पानिपतच्या पराभवाचा मोठा वाटा त्यांचा आहे, अशी त्याची भूमिका दिसते, उलट रघुनाव यादव भाऊंबद्दल अभिमानाने, गौरवपूर्ण शब्दांनी लिहितो. त्यांनी घेतलेले ' सतीचे वाण' त्यांचे